Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

RCBच्या 'या' खेळाडूवर महिलेने लावले लैंगिक शोषणाचे आरोप, लग्नाचं आमिष दाखवून पाच वर्षं संबंध, FIR दाखल

FIR on RCB Player: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजेतेपदाच्या विजयात महत्त्वाचा वाटा असलेला एक खेळाडू आता अडचणीत सापडला आहे. एका महिलेने त्यांच्यावर पाच वर्षांपासून मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला आहे.  

RCBच्या 'या' खेळाडूवर महिलेने लावले लैंगिक शोषणाचे आरोप, लग्नाचं आमिष दाखवून पाच वर्षं संबंध, FIR दाखल

RCB Player accused by women: आयपीएल (IPL ) च्या विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचा वेगवान गोलंदाज सध्या मोठ्या अडचणीत सापडला आहे. एका महिलेने त्याच्यावर पाच वर्षे मानसिक आणि शारीरिक शोषण केल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केली आहे. इतकंच नव्हे तर ही तक्रार थेट मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचली आहे, आणि पोलिसांना 21 जुलैपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. हा खेळाडू यश दयाल (yash dayal accused by woman) आहे.  अचानक समोर आलेल्या वृत्तामुळे तो चर्चेत आला आहे. 

गाझियाबादच्या महिलेची तक्रार

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, गाझियाबादमध्ये राहणाऱ्या पीडित महिलेने उत्तर प्रदेश मुख्यमंत्र्यांच्या ऑनलाइन तक्रार पोर्टलवर याबाबत तक्रार दाखल केली आहे. इंदिरापूरम सर्कल ऑफिसरकडे याची अधिकृत चौकशीची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, पीडितेने 14 जून 2025 रोजी महिला हेल्पलाइन क्रमांक 181 वरही संपर्क साधला होता अशी माहिती आहे. मात्र त्यावेळी स्थानिक पोलीस ठाण्यातून पुढील कारवाई झाली नव्हती, असंही तिने सांगितलं आहे.

हे ही वाचा: 'या' मोठ्या खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा, लवकरच प्रियंका चोप्रासोबत दिसणार ब्लॉकबस्टर चित्रपटात!

 

लग्नाचं आमिष दाखवून पाच वर्षं संबंध

एफआयआरमध्ये पीडित महिलेने स्पष्ट केलं आहे की, ती गेल्या पाच वर्षांपासून यश दयालसोबत रिलेशनशिपमध्ये होती. या काळात त्याने तिला लग्नाचं आमिष दाखवून तिचं मानसिक, शारीरिक आणि आर्थिक शोषण केलं. तिने यशविरोधात व्हिडिओ कॉल्स, चॅट्स, स्क्रीनशॉट्स आणि फोटो यासारखे पुरावे सादर केले आहेत.

हे ही वाचा: Sourav Ganguly Biopic: ठरलं तर मग! 'हा' अभिनेता सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये साकारणार मुख्य भूमिका

 

काय म्हणाली महिला?

ती महिला म्हणाली की, "त्याने मला आपल्या कुटुंबाशी भेटवलं, पतीसारखं वागलं आणि यामुळे मला विश्वास बसला. मात्र जेव्हा मला त्याच्या खोटेपणाची जाणीव झाली आणि मी विरोध केला, तेव्हा त्याने माझ्यावर हात उगारला. याशिवाय त्याने माझा  मानसिक छळही केला. या नात्यात मी केवळ भावनिकच नाही तर आर्थिकदृष्ट्याही खूप त्रासली होते."

हे ही वाचा: रिंकू सिंह होणार सरकारी अधिकारी! साखरपुड्यानंतर चमकले नशीब, कोणत्या विभागात जॉइनिंग मिळणार?

 

इतर महिलांसोबतही अशाच प्रकारचे संबंध?

पीडितेचा दावा आहे की, यश फक्त तिच्याशीच नाही तर इतर अनेक महिलांशीही अशाच पद्धतीचे फसवे संबंध ठेवत होता. "माझ्यावर जे घडलं, ते त्याने इतर महिलांसोबतही केलं आहे. मात्र पोलिसांनी माझ्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं." असं ती म्हणाली.

हे ही वाचा: ना वय पाहिले ना समाजाची पर्वा केली, 'हा' क्रिकेटपटू पडला विवाहित महिलेच्या प्रेमात! जाणून घ्या रंजक प्रेमकहाणी

 

पाच चेंडूंवर पाच षटकार

हे लक्षात घ्यायला हवं की यश दयाल तोच क्रिकेटर आहे, ज्याच्यावर रिंकू सिंगने एका आयपीएल (IPL)  सामन्याच्या शेवटच्या षटकात सलग पाच षटकार मारून कोलकाता नाईट रायडर्सला थरारक विजय मिळवून दिला होता. त्या वेळी यश गुजरात टायटन्स संघात होता. त्यानंतर त्याचा आरसीबी (RCB) संघात समावेश झाला.

Read More