Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

जगातील सर्वात उंच खेळाडूची IPL मध्ये एन्ट्री, प्लेऑफमध्ये RCBचा मास्टरस्ट्रोक, बाबर झालाय 5 वेळा गिऱ्हाइक!

RCB IPL 2025 Replacement Player:  मुजरबानी आरसीबीकडून आयपीएल 2025 च्या प्लेऑफमध्ये खेळण्यासाठी आलाय. 

जगातील सर्वात उंच खेळाडूची IPL मध्ये एन्ट्री, प्लेऑफमध्ये RCBचा मास्टरस्ट्रोक, बाबर झालाय 5 वेळा गिऱ्हाइक!

RCB IPL 2025 Replacement Player:  विराट कोहलीची आरसीबी टीम आयपीएल 2025 च्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. अशातच आरसीबीने एक मास्टर स्ट्रोक खेळला. त्यांनी टीममध्ये अशा खेळाडूला आणलंय ज्याची गणना जगातील सर्वात उंच खेळाडूंमध्ये केली जाते.  ब्लेसिंग मुजरबानी असे त्याचे नाव आहे. 28 वर्षीय मुजरबानी हा झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज आहे आणि तो आरसीबीकडून आयपीएल 2025 च्या प्लेऑफमध्ये खेळण्यासाठी आलाय. आरसीबीने त्याला लुंगी एनगिडीच्या जागी घेतले आहे.

मुजरबानीची उंची किती?

ब्लेसिंग मुजरबानीची उंची 6 फूट 8 इंच असल्याचे सांगितले जाते. आता यानुसार तो मार्को जॅन्सनइतका उंच आहे. त्याची उंचीही 6 फूट 8 इंच आहे. त्यामुळे हे दोघेही सध्याच्या क्रिकेटमधील सर्वात उंच खेळाडू आहेत. ब्लेसिंग मुजरबानी हा आरसीबीमधून खेळतोय. ब्लेसिंग हा असा वेगवान गोलंदाज आहे ज्याच्यासमोर पाकिस्तानचा सर्वात मोठा फलंदाज बाबर आझम देखील क्रिकेटच्या मैदानावर थरथर कापतो. त्याने बाबर आझमला आतापर्यंत 5 वेळा आऊट केलंय.  

मुजरबानी घेईल लुंगी एनगिडीची जागा 

मुजरबानी आणि बाबर आझमची कहाणी काय आहे ते जाणून घेऊया. प्रथम त्याने लुंगी न्गिडीची जागा का घेतली ते समजून घेऊया. कारण WTC फायनल पाहता दक्षिण आफ्रिकेने 26 मे पर्यंत आयपीएलमधून आपल्या सर्व खेळाडूंना परत बोलावलंय. लुंगी न्गिडी हा दक्षिण आफ्रिकेचा एक प्रमुख गोलंदाज देखील आहे. जो WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्या संघाचा एक महत्त्वाचा चेहरा असेल.

असे असले तरी लुंगी एनगिडी आरसीबीकडून त्याचा पुढचा सामना खेळेल. हा सामना 23 तारखेला बेंगळुरूमध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आहे. याचा अर्थ असा की मुजरबानी पुढील सामन्यात आरसीबीकडून खेळताना दिसणार नाही. पण त्यानंतर आरसीबी शेवटच्या ग्रुप टप्प्यातील सामन्यात आणि नंतर प्लेऑफमध्ये त्याचा फायदा करुन घेऊ शकते.

मुजरबानीने बाबर आझमला 5 वेळा बाद केलंय

6 फूट 8 इंच उंचीच्या ब्लेसिंग मुझारबानीसमोर पाकिस्तानचा महान फलंदाज बाबर आझमचे पाय कसे थरथरतात हेपण आता जाणून घ्या. आतापर्यंत मुजराबानीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बाबरला 5 वेळा बाद केलंय. जे त्याच्या वर्चस्वाचा सर्वात मोठा पुरावा मानला जातो. या काळात बाबर आझमने त्याच्याविरुद्ध 105 चेंडूत 21.20 च्या अगदी सामान्य सरासरीने अवघ्या 106 धावा केल्यायत.

Read More