Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

विराटला आऊट दिल्याने ट्विटरवरुन संताप होतोय व्यक्त

कोहलीच्या विकेटवरुन ट्विटवर वाद

विराटला आऊट दिल्याने ट्विटरवरुन संताप होतोय व्यक्त

पर्थ : ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये विराट कोहलीच्या विकेटवरुन ट्विटवर सध्या वाद सुरु झाला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताला गरज असताना भारताचा कर्णधार विराट कोहलीने मोठी इनिंग खेळली. त्याच्या शतकाच्या जोरावर भारताने पहिल्या इनिंगमध्ये 283 रन पर्यंत मजल मारता आली. पण तो ज्या बॉलवर कॅच आऊट झाला त्यावरुन आता जगभरात आयसीसीसमोर प्रश्न उपस्थित केले जात आहे. अनेक क्रिकेटर्सने देखील यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

विराट कोहलीचे चाहते या निर्णयाविरुद्ध संताप व्यक्त करत आहे. विराट कोहली हा आऊट नव्हता असं अनेकांचं म्हणणं आहे. थर्ड अंपायरने देखील विराटला आऊट दिल्याने एकच राग व्यक्त होत आहे. जगभरात हा मुद्दा आता चर्चेचा विषय बनला जात आहे.

Read More