Rinku Singh And Priya Saroj : जून महिन्यात भारताचा स्टार क्रिकेटर रिंकू सिंह (Rinku Singh) आणि खासदार प्रिया सरोज (Priya Saroj) या दोघांचा साखरपुडा झाला होता. दोघांच्या साखरपुड्याला राजकीय आणि क्रिकेट क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळींची उपस्थिती होती. साखरपुड्यानंतर दोघांचं लग्न हे नोव्हेंबर महिन्यात होणार असं निश्चित झालं होतं, मात्र आता त्यांचं लग्न पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समधून समोर येतेय.
रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांच्या नात्याची चर्चा जानेवारी महिन्यापासूनच सुरु होती. दोघे लवकरच विवाह करणार असून त्यांच्या नात्याला दोघांच्या कुटुंबाकडून सुद्धा संमती असल्याचे समोर आले होते. 8 जून रोजी लखनऊच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये रिंकू आणि सरोज यांचा साखरपुडा संपन्न झाला. या कार्यक्रमाला अखिलेश यादव सह जया बच्चन, बीसीसीआयचे राजीव शुल्का, भुवनेश्वर कुमार इत्यादींची उपस्थिती होती. दोघांचं लग्न हे नोव्हेंबर महिन्यात होणार असं निश्चित झालं होतं. मात्र आता मीडिया रिपोर्ट्समधून त्यांचं लग्न लांबणीवर पडल्याचं सांगितलं जात आहे.
हेही वाचा : CSK च्या खेळाडूने मुंबईच्या 'या' इमारतीत खरेदी केलं आलिशान घर, किंमत ऐकून थक्क व्हाल
अमर उजालामध्ये छापलेल्या एका रिपोर्टनुसार रिंकू सिंहच्या बिझी शेड्यूलमुळे रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांच लग्न पुढे ढकलण्यात आलं आहे. अमर उजालाने रिंकू आणि प्रिया यांच्या कुटुंबातील सदस्याने दिलेल्या माहितीच्या हवाल्याने सांगितले की दोघांचं लग्न हे आता फेब्रुवारी 2026 मध्ये होईल. दोघांच्या लग्नाची नवीन तारीख लवकरच समोर येईल. रिंकू सिंह आणि प्रिया सरोज हे दोघे पूर्वी 18 नोव्हेंबर 2025 रोजी वाराणसी येथील आलिशान हॉटेल ताजमध्ये लग्नबंधनात अडकणार होते.
नोव्हेंबर 2025 च्या सुरुवातीला टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असून येथे ते ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 सामन्यांची टी 20 सीरिज खेळतील. त्यानंतर साऊथ आफ्रिकेचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार असून येथे भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज आणि तीन सामन्यांची वनडे सीरिज खेळवण्यात येणार आहे. रिंकू सिंहने भारताकडून टी 20 आणि वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. त्यामुळे साऊथ आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियात त्याला संधी मिळू शकते. रिंकू सिंहने टी 20 मध्ये आतपर्यंत 33 सामने खेळले असून यात 546 धावा आणि 2 विकेट सुद्धा घेतलेत. तर वनडेमध्ये त्याने 2 सामन्यात 55 धावा केल्या असून यात 1 विकेट सुद्धा घेतलीये.