Rinku Singh and Priya Saroj: भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंगचा साखरपुडा झाल्याच्या चर्चा सुरु आहेत. अनेक सोशल मीडिया पोस्टमध्ये असा दावा केला जातोय. उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांच्याशी रिंकू सिंहचे नाव जोडले जात आहे. या दोघांचा साखरपुडा झाला असून लवकरच ते लग्न करणार असल्याच्या चर्चा जोरात सुरु आहेत. असे असले तरी रिंकू किंवा प्रिया सरोज यांच्याकडून यावर कोणती अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नाही.
Rinku Singh gets engaged to Samajwadi Party MP Priya Saroj.
— ASHER. (@ASHUTOSHAB10731) January 17, 2025
- Many congratulations to them! pic.twitter.com/Owo6Klf5ip
RINKU SINGH GOT ENGAGED WITH SP MP PRIYA SAROJ..
— Tanuj Singh (@ImTanujSingh) January 17, 2025
- Many Congratulations to Rinku Singh and Priya Saroj. pic.twitter.com/GuCmTMMww2
रिंकू सिंग हा भारताच्या 2024 च्या टी20 विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होता. तो संघासोबत प्रवासी राखीव खेळाडू म्हणून होता. 22 जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेच्या संघात रिंकू सिंगचा समावेश आहे. आयपीएल 2023 मध्ये रिंकू सिंहने स्वतःची ओळख बनवली. त्याचा आयपीएल 2024 चा हंगाम सामान्य राहिला. ज्यामध्ये त्याने 18.67 च्या सरासरीने 168 धावा केल्या. असे असले तरी त्याची टीम केकेआरने तिसरे विजेतेपद जिंकले.
रिंकूने भारतासाठी 30 टी-20 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 507 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने 2 एकदिवसीय सामने खेळताना 55 धावा केल्या आहेत. रिंकू सिंगने अनेक वेळा मॅच फिनिशरची भूमिका खूप चांगल्या प्रकारे बजावली आहे. समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोजशी त्याचा साखरपुडा झाल्याच्या चर्चा सोशल मीडियात सुरु आहेत.
Rinku Singh gets engaged to Samajwadi Party MP Priya Saroj.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 17, 2025
- Many congratulations to them! pic.twitter.com/7b7Hb0D2Em
Cricketer Rinku Singh gets engaged to Samajwadi party MP Priya Saroj. pic.twitter.com/cxe4oRxkKG
— Satish Mishra (@SATISHMISH78) January 17, 2025
Rinku Singh gets engaged to Samajwadi Party MP Priya Saroj.
— RCBIANS OFFICIAL (@RcbianOfficial) January 17, 2025
- Many congratulations to them! pic.twitter.com/GlB3e82bEu
प्रिया सरोज या समाजवादी पक्षाच्या सदस्य आहेत. भारतीय राजकारणात आपला ठसा उमटवणाऱ्या त्या सर्वात तरुण नेत्यांपैकी एक आहेत. प्रिया सरोज या उत्तर प्रदेशातून 3 वेळा खासदार राहिल्या आहेत. सध्याच्या आमदार तूफानी सरोज यांची मुलगी आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून प्रियाने राजकारणात पाऊल ठेवले आणि 2024 मध्ये मछलीशहर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करून लोकसभेवर निवडून आल्या. त्यांनी भाजप उमेदवाराचा पराभव करून जागा जिंकली.