Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2025: शतक ठोकलेल्या ऋषभ पंतला BCCI ने ठोठावला दंड; 'त्या' एका चुकीची संपूर्ण संघाला मोजावी लागली किंमत

आयपीएलच्या आचारसंहितेनुसार किमान ओव्हर-रेटच्या संबंधित संघाचा हंगामातील हा तिसरा गुन्हा असल्याने, ऋषभ पंतला 30 लाखांचा दंड ठोठावण्यात आला.  

IPL 2025: शतक ठोकलेल्या ऋषभ पंतला BCCI ने ठोठावला दंड; 'त्या' एका चुकीची संपूर्ण संघाला मोजावी लागली किंमत

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) विरुद्धच्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्स संघाचा कर्णधार ऋषभ पंतला दंड ठोठावण्यात आला आहे. स्लो ओव्हर-रेटमुळे ही कारवाई कऱण्यात आली आहे. आयपीएलच्या आचारसंहितेनुसार किमान ओव्हर-रेट गुन्ह्यांशी संबंधित हंगामातील त्याच्या संघाचा हा तिसरा गुन्हा असल्याने, ऋषभ पंतला 30 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. इम्पॅक्ट प्लेअरसह प्लेइंग इलेव्हनमधील उर्वरित सदस्यांना प्रत्येकी 12 लाख किंवा त्यांच्या संबंधित मॅच फीच्या 50 टक्के, जे कमी असेल तो दंड ठोठावण्यात आला आहे.

दरम्यान या सामन्यात, लखनऊला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध सहा धावांनी पराभव पत्करावा लागला. लखनौच्या आयपीएल 2025 हंगामाचा शेवट त्यांच्या घरच्या मैदानावरच झाला. त्यांना आठ सामन्यांपैकी पाच आणि नंतर शेवटच्या सहा सामन्यांमध्ये एकमेव विजय मिळवता आला.  यामुळे त्यांच्यावर प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्याची वेळ आली. 

पंजाब गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहिला, तर बंगळुरु संग आणखी दोन गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. आता बंगळुरु गुरुवारी क्वालिफायर 1 मध्ये पंजाब किंग्जचा सामना करेल. तर तिसऱ्या स्थानावर घसरलेल्या गुजरात टायटन्सचा सामना शुक्रवारी एलिमिनेटरमध्ये मुंबई इंडियन्सशी होईल.

मयंक अग्रवाल आणि जितेश शर्मा यांच्यातील नाबाद 107  धावांच्या भागीदारीच्या बळावर बंगळुरूने स्पर्धेच्या इतिहासातील तिसऱ्या सर्वाधिक यशस्वी धावांचा पाठलाग केला. उल्लेखनीय म्हणजे, 200 पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य गाठण्याची आरसीबीची ही तिसरी वेळ होती. आरसीबीचा सहा विकेटने मिळवलेला विजय हा लखनौमध्ये सर्वाधिक धावांचा पाठलाग करणारा आहे.

Read More