Rishabh Pant : पायाला फ्रॅक्चर असून सुद्धा भारत - इंग्लंड (India VS England) चौथ्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाचा उपकर्णधार ऋषभ पंतने अर्धशतक ठोकले. त्यानंतर त्याच्या शूरतेचे आणि चिकाटीचे अनेकांना कौतुक केले. आता ऋषभ पंतने असं काम केलंय ज्यामुळे पुन्हा एकदा तो युवकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. भारताच्या स्टार फलंदाजाने कर्नाटकमधील एका गरीब विद्यार्थिनीला आर्थिक मदत करून तिच्या उच्च शिक्षणासाठी मोठा वाटा उचलला आहे.
ज्योती कनबुर ही कर्नाटकच्या बागलकोट येथे राहणारी विद्यार्थिनी असून कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे तिला शिक्षण पूर्ण करण्यात अडचणी येत होत्या. ज्योती सध्या बीसीएचा अभ्यास करत असून त्यानंतर अजून उच्च पदवी प्राप्त करण्याचं तिचं स्वप्न आहे. पण गरिबी तिच्या स्वप्नांच्यामध्ये अडथळा आणत होती. तिचे वडील गावात एक लहानसं हॉटेल चालून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तर ज्योतीचा भाऊ शेतात मजूर म्हणून काम करतात. चार मुलं असणाऱ्या या कुटुंबाची आर्थिक स्थिती फारच हलाकीची होती.
घरची आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी पीयूसी (कॉमर्स) मध्ये तिने 85 टक्के गन मिळवले. शेती आणि मजुरीतून मिळवलेल्या पैशातून तिने आपले शिक्षण पूर्ण केले. पण जेव्हा तिला जमखंडी येथील बीएलडीई कॉलेजमध्ये बीसीएच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या कुटुंबाला फी भरणे शक्य झाले नाही. अशा परिस्थितीत टीम इंडियाचा विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत तिच्या मदतीसाठी पुढे आला.
ज्योतीच्या या आर्थिक समस्येबाबत स्थानिक रहिवासी अनिल हुनासिकट्टी यांना समजले. ज्यांनी ही गोष्ट त्यांचा मित्र अक्षय नायक यांना सांगितली. अक्षय नायक बेंगळुरू आणि मुंबईत ऋषभ पंतसाठी डिजिटल मॅनेजर म्हणून काम करतात. अक्षयने पंत यांना विद्यार्थिनीच्या परिस्थितीबद्दल सांगितले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, ऋषभ पंतने ताबडतोब पुढाकार घेतला आणि 17 जुलै रोजी आरटीजीएसद्वारे कॉलेजला 40,000 रुपये पाठवले आणि ज्योतीची फी जमा केली.
ऋषभ पंतने उचललेल्या या पावलामुळे ज्योतीचा पुढील शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला. ऋषभ पंतने ज्योतीला जी मदत केली त्याबद्दल बीएलडीई कॉलेज प्रशासनाने त्याला अधिकृत कौतुकाचे पत्र पाठवून आभार मानले.
1. ऋषभ पंतला ज्योतीच्या समस्येबाबत कोणी सांगितलं?
स्थानिक रहिवासी अनिल हुनासिकट्टी यांनी ज्योतीच्या परिस्थितीची माहिती अक्षय नायक यांना दिली. अक्षय नायक हे बेंगळुरू आणि मुंबईत ऋषभ पंतसाठी डिजिटल मॅनेजर म्हणून काम करतात. त्यांनी ही माहिती पंत यांच्यापर्यंत पोहोचवली.
2. ज्योतीच्या कुटुंबाची पार्श्वभूमी काय आहे?
ज्योतीच्या कुटुंबात चार मुले आहेत. तिचे वडील गावात छोटे हॉटेल चालवतात, तर तिचा भाऊ शेतात मजुरी करतो. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत कमकुवत आहे.
3. ज्योतीला बीसीएच्या शिक्षणात कोणत्या अडचणी आल्या?
ज्योतीला जमखंडी येथील बीएलडीई कॉलेजमध्ये बीसीएच्या पहिल्या वर्षात प्रवेश घ्यायचा होता, पण तिच्या कुटुंबाला फी भरणे शक्य नव्हते, ज्यामुळे तिचे शिक्षण थांबण्याची भीती होती.