IPL 2025 : आयपीएल 2025 च्या संपूर्ण सीजनमध्ये ऋषभ पंतची बॅट शांतच होती. 13 सामन्यात त्याने जवळपास 140 धावा केल्या होत्या. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू असूनही सीजनमध्ये एवढा वाईट परफॉर्मन्स असल्याने तो टीकाकाऱ्यांच्या निशाण्यावर होता. मात्र प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या लखनऊ सुपर जाएंट्स संघाच्या फलंदाजांची आयपीएल 2025 मधील लीग स्टेजच्या शेवटच्या सामन्यात बॅट तळपली. ऋषभ पंतने मंगळवारी आरसीबी विरुद्ध सामन्यात दणदणीत शतक ठोकलं.
आयपीएल 2025 मधील 70 वा लीग स्टेज सामना लखनऊ सुपर जाएंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स यांच्यात खेळवण्यात आला. लखनऊचं होम ग्राउंड असलेल्या एकना स्टेडियमवर हा सामना पार पडला असून यात आरसीबीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे लखनऊला फलंदाजीसाठी उतरावे लागेल. लखनऊकडून फलंदाजी करताना त्यांचा कर्णधार ऋषभ पंत याने सर्वाधिक 118 धावांची कामगिरी केली. त्याने 55 बॉलमध्ये 100 धावा करून शतक पूर्ण केलं. नाबाद शतकीय खेळी खेळलेल्या ऋषभ पंतने यादरम्यान 11 चौकार आणि 8 षटकार ठोकले. ऋषभचं आयपीएलमधील हे दुसरं शतक ठरलं.
लखनऊच्या फलंदाजांनी 20 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 227 धावांची कामगिरी केली. लखनऊच्या संघाने आरसीबीला विजयासाठी 22८ धावांचे आव्हान दिले आहे.
(SpideyGlaze) May 27, 2025
आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये ऋषभ पंतवर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली लागली. लखनऊ सुपर जाएंट्सचे मालक संजीव गोएंका यांनी ऋषभला 27 कोटींना विकत घेतले. त्यामुळे तो आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला.
मिचेल मार्श, मॅथ्यू ब्रेट्झके, निकोलस पूरन, ऋषभ पंत, आयुष बडोनी, अब्दुल समद, हिम्मत सिंग, शाहबाज अहमद, दिग्वेश सिंग राठी, आवेश खान, विल्यम ओरोर्के
फिलिप सॉल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा , रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, नुवान तुषारा, सुयश शर्मा