Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

पहिल्याच टेस्ट मॅचमध्ये ऋषभ पंतचा दुसरा विक्रम

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारतानं जोरदार पुनरागमन केलं आहे. 

पहिल्याच टेस्ट मॅचमध्ये ऋषभ पंतचा दुसरा विक्रम

नॉटिंगहम : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारतानं जोरदार पुनरागमन केलं आहे. हार्दिक पंड्याचा वादळी स्पेलमुळे इंग्लंडचा १६१ रनवर ऑल आऊट झाला आहे. यामुळे भारताला पहिल्या इनिंगमध्ये १६८ रनची आघाडी मिळाली आहे. हार्दिक पंड्यानं ६ ओव्हरमध्ये २८ रन देऊन इंग्लंडच्या ५ विकेट घेतल्या. हार्दिकनं पहिल्यांदाच टेस्ट क्रिकेटमध्ये ५ विकेट घेतल्या आहेत. हार्दिक पंड्याबरोबरच ऋषभ पंतच्या विकेट कीपिंगमुळेही या मॅचमध्ये भारतानं पुनरागमन केलं आहे, असं म्हणता येईल.

पहिल्या इनिंगमध्ये ऋषभ पंतनं तब्बल ५ कॅच घेतले. आपली पहिलीच टेस्ट खेळणाऱ्या ऋषभ पंतनं हा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. पहिलीच टेस्ट खेळणाऱ्या कोणत्याही भारतीय विकेट कीपरला ५ कॅच घेता आले नाहीत. याआधी नाना जोशी यांनी इंग्लंडविरुद्ध १९५१ साली दिल्लीमध्ये, नरेन ताम्हाणे यांनी पाकिस्तानविरुद्ध १९५५ साली ढाक्यामध्ये आणि चंद्रकांत पाटणकर यांनी १९५५ साली न्यूझीलंडविरुद्ध कोलकात्यामध्ये ४ विकेट घेतल्या होत्या.

आपली पहिलीच टेस्ट मॅच खेळणाऱ्या ऋषभ पंतचा हा काही पहिलाच विक्रम नाही. याआधी पंतनं बॅटिंग करताना टेस्ट क्रिकेटमधील पहिली रन सिक्स मारून केली. पंत टेस्ट इतिहासात सिक्स मारुन कारकिर्दीची सुरुवात करणारा १२ वा खेळाडू आणि पहिला भारतीय ठरला आहे.

सगळ्यात आधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या एरिक फ्रीमॅनने केला होता. यानंतर कार्लिसले बेस्ट, केथ डाबेंगवा, डेल रिचर्डसन, शैफुल इस्लाम, जहूरुल इस्लाम, अल अमीन हुसैन, मार्क क्रेग, धनजंय डिसिल्वा, कॅमरुल इस्लाम, सुनील एमब्रिस आणि आता ऋषभ पंतच्या नावे हा रेकॉर्ड बनला आहे.

Read More