Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'आम्ही सर्व तुझ्यासाठीच...' RJ महवशने युझवेंद्र चहलसाठी केली खास पोस्ट, युझीच्या कमेंटने वेधलं लक्ष

IPL 2025 : पंजाब किंग्सने चेन्नई सुपरकिंग्सवर 18 धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर RJ महवशने युझवेंद्र चहलसाठी एक खास पोस्ट केली. या पोस्टने सध्या सर्वांचं लक्ष वेधलंय. 

'आम्ही सर्व तुझ्यासाठीच...'  RJ महवशने युझवेंद्र चहलसाठी केली खास पोस्ट, युझीच्या कमेंटने वेधलं लक्ष

IPL 2025 : भारताचा स्टार क्रिकेटर युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि धनश्री वर्मा या दोघांचा घटस्फोट झाला आहे. या दोघांमधील पती पत्नीचं नातं संपल्यावर युझवेंद्र चहलचं नाव RJ महवशशी जोडलं जातंय. अनेकदा ते दोघे एकत्र दिसतात. मंगळवारी चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात सामना रंगला होता. हा सामना पाहण्यासाठी  RJ महवश सुद्धा हजर होती. यावेळी ती पंजाब किंग्सला सपोर्ट करताना दिसली. सामन्यात पंजाब किंग्सने चेन्नई सुपरकिंग्सवर 18 धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर RJ महवशने (RJ Mahvash) युझवेंद्र चहलसाठी एक खास पोस्ट केली. या पोस्टने सध्या सर्वांचं लक्ष वेधलंय. 

चंदीगड स्टेडियमवर पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स सामन्यात पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करून 219 धावा केल्या तर चेन्नईला विजयासाठी 220 धावांचे आव्हान दिले. पण हे आव्हान चेन्नई सुपरकिंग्स पूर्ण करू शकली नाही आणि त्यांचा 18 धावांनी पराभव झाला. या सामन्यात पंजाबच्या गोलंदाजांना चेन्नईच्या 5 विकेट घेण्यात यश आले. बुधवारी दुपारी RJ महवश हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली यात तिने युझवेंद्र चहल सोबतचे काही फोटो शेअर केले.  RJ महवश कॅप्शनमध्ये म्हणाली की, 'आपल्या लोकांसाठी आम्ही अडचणीत त्यांच्या मागे नेहमी खडकासारखे उभे राहू. आम्ही सगळे तुझ्यासाठी आलो आहोत युझवेंद्र चहल. 

हेही वाचा : IPL 2025 : 'मी काही बोललो तर वाद होईल...' होमग्राउंडवरील पराभवानंतर अजिंक्य रहाणे पिच क्यूरेटरबद्दल स्पष्टच बोलला

 

RJ महवशच्या पोस्टखाली युझवेंद्र चहलचे फॅन्स दोघांना खूप प्रेम देताना दिसतायत. स्पिनर युझवेंद्र चहलने सुद्धा RJ महवशचाय पोस्ट खाली कमेंट करून लिहिले की, 'तुम्ही माझ्यासाठी माझे स्पिन आहात. तुमच्या सर्वांचे धन्यवाद!'

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

fallbacks

धनश्रीला युजवेंद्रकडून पोटगीत मिळाले 4.75 कोटी रुपये: 

घटस्फोट झाल्यावर धनश्रीला युजवेंद्रकडून 4.75 कोटी रुपये पोटगी म्हणून मिळाले आहेत. कोर्टात सादर केलेल्या कागदपत्रांनुसार चहल आणि धनश्री हे दोघे 2020 मध्ये लग्न बंधनात अडकले. परंतु त्यांच्या नात्यात सर्वकाही नीट नव्हते त्यामुळे 2022 पासून ते वेगळे राहतायत. अखेर काही महिन्यांपूर्वी त्यांनी मुंबईच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली. तसेच हायकोर्टाने त्यांचा सहा महिन्यांचा कुलिंग पिरिएड सुद्धा माफ केल्याने त्यांच्या घटस्फोटावर लवकर निर्णय झाला त्यांचा घटस्फोट 20 मार्च 2025 रोजी अधिकृतपणे निश्चित झाला.

Read More