RJ Mahvash says 'stealing someone's husband' is CHEATING: भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि त्यांच्या पत्नी धनश्री वर्मा यांचं नातं आता संपलं आहे. दोघांनी काही महिन्यांपूर्वी घटस्फोट घेतला आणि त्यानंतर युजीचं नाव चर्चेत आलं ते RJ महवशसोबत. अलीकडे चहल आणि महवश अनेक वेळा एकत्र दिसले आहेत. मग तो IPL चा सीझन असो की लंडनमधील बर्थडे वेकेशन. याचमुळे महवश सध्या सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करतेय. अनेकांनी तिच्यावर "नवरा चोरला", असं म्हणत सडकून टीका केली आहे. पण आता स्वतः महवश पुढे आली आहे आणि तिने एक व्हिडीओद्वारे नेटिझन्सला फटकारत जबरदस्त उत्तर दिलं आहे.
महवशने आपल्या स्टोरीमध्ये लिहिलं "कुणाचा नवरा चोरणं? हो, ते चीटिंगच आहे". यावर तिला ट्रोल करताच तिने स्क्रीनशॉट शेअर करत लिहिलं, "माझ्यावर आरोप करणाऱ्यांनीच बहुतेक मला चोरताना पाहिलंय! लोक काहीही बातम्या बनवतात, फक्त व्यूज मिळावेत म्हणून." त्यासोबतच, तिने एक व्हिडीओ पोस्ट केला ज्यात ती स्पष्ट करते की कोणत्या कोणत्या गोष्टींना 'चीटिंग' म्हणता येतील.
"कोणालातरी सीक्रेट मॅसेज करणं – चीटिंग,
एक्ससोबत लपून बोलणं – चीटिंग,
हटके इमोजी पाठवणं – चीटिंग,
अशा मुलींना फॉलो करणं ज्या सेमी-न्यूड कंटेंट टाकतात – चीटिंग,
स्नॅपचॅट ID लपवणं – चीटिंग,
आणि स्वतःला सिंगल म्हणणं – हेही चीटिंगच!"
तिच्या मते, काही गोष्टी थांबवायला हव्यात आणि प्रत्येक गोष्टीसाठी तिच्यावर आरोप करण्याचं सत्र बंद झालं पाहिजे.
महवशवर आरोप होतानाच, लोकांनी चहललाही सोडलं नाही. अनेकांनी लिहिलं “माहीत असूनही चहलला डेट करणं, म्हणजे चीटिंग नाही का?”, तर एकाने म्हटलं की “लंडनला मागे मागे फिरणं, हेही चीटिंगच!” तर अजून एकाने कमेंट केली की, “युजी भाऊ, काळजी घे!”
सध्या युजवेंद्र आणि महवश दोघंही एकत्र वेळ घालताना दिसत असले तरी दोघांपैकी कोणताही संबंध अधिकृतपणे मान्य केलेला नाही. मात्र सोशल मीडियावरच्या अफवा, ट्रोलिंग आणि प्रतिक्रियांमुळे हे प्रकरण चर्चेचा विषय बनलं आहे.