RJ Mahvash Talks on Dating With Yuzvendra Chahal : भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल हा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. ही चर्चा युझवेंद्र चहल हा पत्नी धनश्री वर्मापासून विभक्त झाल्यानंतर सुरु झाली आहे. त्यानंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान RJ महवशसोबत त्याला पाहिल्यानंतर रंगली. त्या दोघांचे सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल झाले. दरम्यान, युझवेंद्र चहलनं या प्रकरणात कोणतही वक्तव्य केलेलं नाही. युझवेंद्रनं या प्रकरणात कमेंट न करण्याचा निर्णय घेतला पण RJ महवशनं यावर प्रतिक्रिया दिली आणि सांगितलं की 'मी सिंगल आहे.'
युवाला दिलेल्या एका मुलाखतीत RJ महवशनं तिच्या रिलेशनशिप स्टेटसविषयी प्रश्न विचारले. RJ महवशनं स्पष्ट केलं की ती सिंगल आहे आणि तिनं सांगितलं की ती लग्नाचा विचार तेव्हा करेल जेव्हा ती लग्नाचा विचार करू शकेल. तिला कॅज्युएल रिलेशनशिपवर विश्वास नाही. तिनं हे देखील शेअर केलं की तिनं आता लग्नाचं प्लॅनिंग थांबवलं आहे कारण तिला आता कोणत्याही नात्यात जाणं हे कठीण वाटतं. या सगळ्या दरम्यान, RJ महवशनं एक धक्कादायक खुलासा केला आहे. ज्यात तिनं सांगितलं की 19 वर्षांची असतानाच तिचा साखरपुडा झाला होता. पण दोन वर्षांत त्याचं नातं संपलं. त्यानंतर तिनं सांगितलं की अलीगढच्या एका छोट्या शहरातून ती येते. तिथल्या लोकांचे विचार हे फक्त योग्य नवरा आणि लग्न करण्यापर्यंत मर्यादीत आहे. हेच कोणत्याही महिलेसाठी असलेलं महत्त्वाचं काम आहे.
हेही वाचा : मनोज कुमार यांच्या कुटुंबात कोण कोण आहे? मुलाचा फ्लॉप अभिनेता ते बिझनेसमॅन होण्यापर्यंतचा प्रवास
RJ महवश आणि युझवेंद्र चहल हे रिलेशनशिपमध्ये असल्याची बातमी बऱ्याच काळापासून सुरू आहे. ही चर्चा युझवेंद्रच्या कथित घटस्फोटाच्या चर्चांनंतर सुरु झाली. ते पण तेव्हा जेव्हा सोशल मीडियावर RJ महवश आणि युझवेंद्र हे पहिल्यांदा एकत्र स्पॉट झाले होते. त्यांचे फोटो चांगलेच चर्चेत झाले त्यानंतर या सगळ्या चर्चा रंगल्या. दरम्यान, युझवेंद्र आणि धनश्री हे दोघं लवकरच घटस्फोट घेणार असल्याचं म्हटलं जातं.