Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

RJ मलिष्का हिने नीरज चोप्रा याच्याकडे मागितली ‘जादू-की-झप्पी’, अशी आली प्रतिक्रिया

Neeraj Chopra News : ऑलिम्पिकमध्ये (Olympics) भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणाऱ्या नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याच्याशी संबंधित एक व्हिडिओ समाजमाध्यमावर जोरदार व्हायरल होत आहे. 

RJ मलिष्का हिने नीरज चोप्रा याच्याकडे मागितली ‘जादू-की-झप्पी’, अशी आली प्रतिक्रिया

टोकियो : Neeraj Chopra News : ऑलिम्पिकमध्ये (Olympics) भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणाऱ्या नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याच्याशी संबंधित एक व्हिडिओ समाजमाध्यमावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये नीरज रेडिओ जॉकी मलिष्का हिला (RJ Malishka) मुलाखत देत आहे. यामध्ये मलिष्का आधी तिच्या काही मित्रांसोबत नाचताना दिसली आणि नंतर मुलाखतीदरम्यान तिने नीरज याच्याकडे ‘जादू की झप्पी’ मागितली. या मागणीनंतर नीरजही स्तब्धच झाला. त्यानंतर त्यांने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

भारताचा ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा टोकियोहून परतल्यानंतर खूपच व्यस्त झाला आहे आणि सतत टीव्ही चॅनेल, रेडिओ आणि वर्तमानपत्रांना मुलाखती देत आहे. अ‍ॅथलेटिक्समध्ये देशासाठी पहिले सुवर्ण जिंकून नीरजने इतिहास रचला.

नीरज ‘रेड एफएम’ या रेडिओ चॅनेलवर व्हिडिओ कॉलद्वारे सहभागी झाला. RJ मलिष्काहिने प्रथम त्याच्यासाठी ‘उडे जब-जब जुल्फेन तेरी’ या गाण्यावर नृत्य केले आणि नंतर त्याच्याकडे  ‘जादू की झप्पी’ची मागणी केली. मलिष्का म्हणाली, मला जाण्याआधी तुला एक ‘जादू की झप्पी’ द्यायची आहे. यावर लाजलेल्या नीरज याने मलिष्का हिला हसत 'तुला लांबूनच नमस्कार, असे उत्तर दिले.

नीरज याचाच बोलबाला

नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचल्यानंतर त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. याशिवाय त्याच्यावर बक्षीसांचा वर्षावर झालाय. तो आता कोट्यवधीश झाला आहे. पुरुषांच्या भालाफेकीच्या अंतिम फेरीत नीरजने 87.58 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह सुवर्ण पदक जिंकले.

Read More