Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Rohit Sharma ने जिंकली फॅन्सची मनं, सामन्यानंतर चिमुरडीची मागितली माफी

स्टँडमध्ये बसलेली एक चिमुरडी रोहितने लगावलेल्या सिक्समुळे जखमी झाली. 

Rohit Sharma ने जिंकली फॅन्सची मनं, सामन्यानंतर चिमुरडीची मागितली माफी

मुंबई : भारतीय कर्णधार रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 76 रन्सची स्फोटक खेळी केली. या ज्याच्या जोरावर पाहुण्यांनी पहिला सामना सहज जिंकला. या सामन्यात एक वाईट घटनाही पाहायला मिळाली. स्टँडमध्ये बसलेली एक चिमुरडी रोहितने लगावलेल्या सिक्समुळे जखमी झाली. 

रोहित मारलेला हा खेळाडू या लहान मुलीला लागला. यावेळी ती जखमी झाल्याचीही चर्चा होती. अशा स्थितीत मैदानावर उपस्थित असलेले सर्व खेळाडू खूपच अस्वस्थ होते. इतकंच नव्हे तर अनावधानाने केलेल्या या चुकीमुळे रोहित शर्मालाही वाईट वाटलं असून त्याने तिची माफी मागितली आहे. 

अशा परिस्थितीत सामना संपल्यानंतर कर्णधार रोहित थेट स्टँडवर बसलेल्या त्या चिमुरडीची माफी मागायला गेला. रोहितने मुलीला टेडी बेअर आणि चॉकलेट्स देखील गिफ्ट दिलं. यावेळी त्याने त्या मुलीच्या तब्येतीचीही विचारपूस केली. रोहितच्या या वागण्याला चाहत्यांनी पसंती दिली असून या घटनेचा फोटो चाहत्यांमध्ये व्हायरल होतोय.

भारतीय डावाच्या 5 व्या ओवहरमध्ये डेव्हिड विलीला पुल शॉट खेळताना रोहितने सिक्स मारला होता, त्या दरम्यान ती छोटी चाहती जखमी झाली होती. मुलीला दुखापत झाल्याचे पाहून सामना काही काळ थांबवण्यात आला, त्यानंतर इंग्लंडचे फिजिओ मुलीच्या मदतीसाठी स्टँडवर पोहोचले. 

रोहितने या सामन्यात 58 चेंडूत 76 धावांची खेळी केली, ज्यामध्ये त्याने 7 चौकार आणि 5 षटकार मारले.

Read More