Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Ind vs SA : कल्पना होती की सोप्पं नसेल...; विजयानंतरही असं का म्हणाला Rohit Sharma?

पहिल्या T20I मध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आठ विकेट्स राखून विजय नोंदवला.

Ind vs SA : कल्पना होती की सोप्पं नसेल...; विजयानंतरही असं का म्हणाला Rohit Sharma?

तिरूअनंतपूरम : पहिल्या T20I मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आठ विकेट्स राखून विजय नोंदवला. यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आनंदात असल्याचं दिसून आलं. तो म्हणाला की, या खेळपट्टीवर फलंदाजी करणं सोपं नव्हतं आणि टीममधील गोलंदाजांनी घेतलेल्या विकेट्समुळे विजय झाला. सामना संपल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने खेळाडूंचं कौतुक केलं.

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, 'अशा सामन्यांमधून खूप काही शिकण्यासारखं आहे. आम्हाला माहित होतं की, खेळपट्टी गोलंदाजांना मदत करेल आणि संपूर्ण सामन्यात खेळपट्टी ओलसर राहिली. सूर्यप्रकाशाअभावी शॉट मारणं कठीण होत होतं. मात्र आम्ही विकेट घेतल्या जो आमच्यासाठी सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला.'

कर्णधार रोहित शर्मा पुढे म्हणाला की, “आम्हाला माहित होतं की 107 हे सोपं लक्ष्य नसेल आणि काहीवेळा तुम्हाला परिस्थिती समजून घेऊन तुमचा शॉट निवडावा लागेल. दोन विकेट्स गमावल्यानंतर सूर्या आणि राहुलची भागीदारी अप्रतिम होती. या दोघांमुळेच आम्ही विजय मिळवू शकलो."

पराभवाचं खापर फलंदाजांवर फोडलं 

दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा या पराभवाचं खापर फलंदाजांवर फोडत म्हणाला, “आम्ही फलंदाजी करण्यात अपयशी ठरलो. आम्ही परिस्थितीनुसार फलंदाजी करू शकलो नाही, तर टीम इंडियाच्या फलंदाजांनी ते केलं. आमच्या गोलंदाजांनी प्रयत्न केले पण फलंदाज रन्सचं करू शकले नाहीत."

भारताचा विजय

आफ्रिकेने टीम इंडियाला विजयासाठी  107 रन्सचं माफक आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. रोहित शर्मा आणि विराट कोहली स्वस्तात माघारी परतले. यानंतर सूर्यकुमार यादव आणि केएल राहुल या जोडीने टीम इंडियाला विजय मिळवून दिला. या जोडीने तिसऱ्या विकेट्ससाठी नाबाद  93 रन्सची विजयी भागादीर केली.

Read More