Rohit Sharma Century : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामधील वनडे सिरीजचा (IND vs NZ 3rd ODI) शेवटचा सामना आज इंदूरमध्ये खेळवला जातोय. या सामन्यात रोहित शर्मा ची कॅप्टन इंनिंग पहायला मिळाळी. अखेर 3 वर्षांच्या कालावधीनंतर रोहित शर्माने (Rohit sharma) वनडे सामन्यात शतक ठोकलं आहे. मात्र 101 रन्सवर रोहित शर्माला माघारी परतावं लागलं आहे.
तिसऱ्या वनडे सामन्यात कर्णधार रोहित शर्माने त्याच्या चाहत्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. अखेर 1100 दिवसांनंतर म्हणजेच तब्बल 3 वर्षानंतर रोहित शर्माने वनडे सामन्यात शतक झळकावलं आहे. रोहितने त्याच्या वनडे करियरमधील 30 वं शतक ठोकलं आहे. यासोबतच रोहितने रिकी पाँटिंगच्या वनडे शतकांच्या रेकॉर्डशी बरोबरी केलीये.
— BCCI (@BCCI) January 24, 2023
Talk about leading from the front!
A magnificent century from #TeamIndia captain @ImRo45
Follow the match https://t.co/ojTz5RqWZf…#INDvNZ | @mastercardindia pic.twitter.com/iR3IJH3TdB
रोहित शर्माने 83 बॉल्समध्ये त्याचं शतक पूर्ण केलं आहे. यामध्ये रोहितने 9 फोर आणि 6 सिक्स लगाववे आहेत. दुसऱ्या बाजूने शुभमन गिलने देखील शतक ठोकलं आहे. गेल्या 4 सामन्यांमध्ये शुभमन गिलचं हे तिसरं शतक आहे. यासह रोहित शर्मा आता वनडेत सर्वाधिक शतकं झळकावण्याच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय. रोहित आणि ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज रिकी पाँटिंग यांच्या नावावर 30-30 शतकं आहेत.
रोहित शर्माने त्याचं शेवटचं वनडे शतक 2020 मध्ये ठोकलं होतं. त्याने त्याचं हे शतक ऑस्ट्रेलियाविरूद्ध झळकावलं होतं. या सामन्यामध्ये रोहितने 119 रन्सची उत्तम खेळी केली होती. गेल्या काही दिवसांपासून तो खराब फॉर्मशी झुंजत असल्याचं दिसलं. अखेर त्याने 3 वर्षानंतर त्याचा शतकांचा दुष्काळ संपवला आहे.
वनडेमध्ये भारतासाठी सर्वात जास्त शतकं