RR vs MI: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या आयपीएलमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. गुरुवारी राजस्थान विरुद्ध मुंबई असा सामना रंगला. राजस्थानविरुद्धही रोहितने जबरदस्त लयीत खेळला आणि शानदार अर्धशतक झळकावले. पण हिटमनच्या अर्धशतकापेक्षाही त्याच्या डीआरएस निर्णयाबद्दल चर्चा झाली. चर्चा झाली कारण त्याने डीआरएस अगदी शेवटच्या सेकंदाला घेतला आणि तो बचावला. हा डीआरएस सोशल मीडियावर एक मोठा मुद्दा ठरला. अनेक चाहते रोहितला भाग्यवान म्हणत असताना दिसले तर काही जण पंचांवर प्रश्न उपस्थित करताना दिसले.
मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीच्या दुसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रोहितचा गडबडला. गोलंदाज फजलहक फारुकीने जोरदार अपील केले आणि लगेचच पंचांनी रोहितला आऊट घोषित केले. चेंडू रोहितच्या बॅकफूटवर लागला होता. त्याचवेळी रोहितचा आत्मविश्वासही कमी दिसत होता. पण नंतर रायन रिकेल्टनने रोहित बोलला आणि शेवटच्या क्षणी रोहितने रिव्ह्यूची मागणी केली. पण त्यावेळी DRS टायमर शून्यावर पोहोचला होता. सगळ्यांच्या नजर पंचांकडे वळल्या. रोहितने मागणी केली आणि पंचांनी रोहितला विरोध न करता तिसऱ्या पंचाशी संपर्क साधला.
हे ही वाचा: ज्या कारणाने धनश्रीसोबत घटस्फोट झाला त्यासाठीच चहल महिन्याला खर्च करणार 3 लाख; RJ महवश कनेक्शन चर्चेत
शेवटच्या सेकंदाला घेतलेला निर्णय यशस्वी ठरला. असे दिसून आले की चेंडू लेग साईडवर टाकण्यात आला होता. रोहित थोडक्यात बचावला. या घटनेनंतर रोहित शर्माने मागे वळून पाहिले नाही आणि ९ चौकारांच्या मदतीने ५३ धावांची शानदार खेळी केली. पण सोशल मीडियावर अनेकांनी त्याच्या डीआरएसच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अशी चर्चा सुरु झाली की, रोहितने रिव्ह्यू मागितला तोपर्यंत टायमर संपला होता.
Rohit Sharma took the DRS after time ran out. How can the Umpire allow him to use DRS after time expired? Will they allow this if it was a RR batter?
— (@Brutu24) May 1, 2025
Umpiring Indians pic.twitter.com/cBFkiWiHzx
हे ही वाचा: IPL 2025 धामधुमीत क्रिकेट विश्वात शोककळा, 34 वर्षीय खेळाडूचं आकस्मिक निधन
राजस्थानविरुद्ध मुंबई इंडियन्सने खूप धावा केल्या. रायन रिकेल्टन आणि रोहित शर्माने अर्धशतके झळकावले. कर्णधार हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव यांनीही ४८-४८ धावांच्या खेळी केली. अशाप्रकारे संघाचा स्कोअर २१७ पर्यंत नेला. या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना, राजस्थानचा अर्धा संघ पॉवर प्लेमध्येच बाद झाला.