Rohit Sharma and Mohammed Siraj Viral Video: आयपीएल 2025 (IPL) सुरु आहे. याच दरम्यान टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने स्टार गोलंदाज मोहम्मद सिराजला एक अनोखी खास भेट दिली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हिटमन सिराजला खूपच मौल्यवान भेटवस्तू दिली. वानखेडेवर मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात रोहित शर्मा आणि मोहम्मद सिराज एकमेकांसमोर येतील. त्याआधी, हिटमनने त्याची भेट सिराजला दिली आहे.
गेल्या वर्षी (२०२४) रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने T-२० विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर बीसीसीआयने भारतीय चॅम्पियन खेळाडूंच्या सन्मानार्थ सर्व खेळाडूंना हिऱ्याच्या अंगठ्या दिल्या. ही अंगठी हिरे आणि सोन्यापासून बनलेली आहे. या अंगठीची किंमत कोट्यवधींमध्ये असल्याचे सांगितले जाते. एवढेच नाही तर प्रत्येक रिंगवर चॅम्पियन खेळाडूचे नाव कोरलेले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला सिराज बीसीसीआयच्या नमन पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहू शकला नाही. पण, टीम इंडियाचा कर्णधार रोहित काढून त्याला ही भेट मिळाली आहे.
बीसीसीआयने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा म्हणाला, " हे मोहम्मद सिराजसाठी आहे. आपल्या सर्वांसाठी बनवलेली एक खास अंगठी त्याला देताना मला अभिमान वाटतो. दुर्दैवाने सिराज कार्यक्रमाला उपस्थित राहू शकला नाही म्हणून मी हे सिराजला देऊ करू इच्छितो."
@mdsirajofficial receives a special ring from #TeamIndia Captain @ImRo45 for his impactful contributions in the team's victorious ICC Men's T20 World Cup 2024 campaign @Dream11 pic.twitter.com/dHSnS4mwu1
— BCCI (@BCCI) May 5, 2025
'असा' रंगला होता सामना
2024 च्या T-20 विश्वचषकात टीम इंडियाने अंतिम सामना रोमांचक पद्धतीने जिंकला. दक्षिण आफ्रिका विजयाच्या उंबरठ्यावर होती, पण सूर्य कुमार यादवचा झेल आणि हार्दिक पंड्याचा शेवटचा षटक सर्वांच्या मनात राहील. या विजयानंतर, भारतीय संघाने कधीही मागे वळून पाहिले नाही आणि शानदार पद्धतीने चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद जिंकले.