Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

INDVSNZ| विजयी खेळी सोबतच रोहितने केला 'हा' विक्रम

रोहित शर्माने आतापर्यंत ९३ टी-२० सामने खेळले आहे.

INDVSNZ| विजयी खेळी सोबतच रोहितने केला 'हा' विक्रम

ऑकलंड | न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने ७ विकेटने विजय मिळवला आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या तुफानी ५० धावांच्या खेळीमुळे  भारतीय संघाला १५९ धावांचे आव्हान सहज पार करता आले. रोहितने आपल्या ५० धावांच्या खेळीत ४ सिक्स आणि ३ फोर ल़गावले. टी-२० कारकीर्दीतील रोहितचे हे १६ वे अर्धशतक होते. याखेळी सोबतच रोहितने आपल्या नावे काही विक्रम केले आहेत.

टी-२० कारकीर्द 

रोहित शर्माने आतापर्यंत ९३ टी-२० सामने खेळले आहे. यात त्याने एकूण २२८८ धावा केल्या आहेत. ११८ ही त्याची टी-२० मधील सर्वोत्कृष्ट खेळी आहे. रोहितने आतापर्यंत आपल्या टी२० कारकीर्दीत ४ शतक तर १६ अर्धशतके लगावले आहेत. तसेच २०४ चौकार तर १०२ सिक्स लगावले आहेत.

पहिला भारतीय

 टी-२० मध्ये रोहित शर्माने ११० सिक्स लगावले आहेत. अशी कामगिरी करणारा रोहित भारताचा पहिला तर क्रिकेट विश्वातील तिसरा खेळाडू ठरला आहे. यासोबतच आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये मार्टिन गुप्टील आणि वेस्ट इंडिजचा क्रिस गेल हे दोघे खेळाडू १०३ सिक्ससोबत संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत.


टी-२० मधील सर्वाधिक धावा

टी -२० या झटपट किक्रेट प्रकारात सर्वात जास्त धावा करणाऱ्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे. यामुळे मार्टिन गुप्टीलची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. गुप्टीलने आपल्या ७६ सामन्यांमध्ये २२७१ धावा केल्या आहेत. यात २ शतक तर १४ अर्धशतकांचा समावेश आहे.  टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत पाकिस्तानचा अनुभवी खेळाडू शोएब मलिकस तिसऱ्या क्रमांकावर आहे. मलिकने आपल्या टी-२० तील १११ सामन्यांमध्ये २२६२ धावा केल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली आहे. कोहलीने आपल्या ६५ सामन्यांमध्ये २१६७ धावा केल्या आहेत. यात त्याने १९ अर्धशतके लगावली आहेत.

Read More