Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

रोहित शर्माने मारली सिराजला टपली; व्हिडीयो पाहून तुम्हीही म्हणाल...

T-20 कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात रोहित शर्माने टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध शानदार विजय मिळवून दिला.

रोहित शर्माने मारली सिराजला टपली; व्हिडीयो पाहून तुम्हीही म्हणाल...

जयपूर : T-20 कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात रोहित शर्माने टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध शानदार विजय मिळवून दिला. बुधवारी जयपूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 5 विकेट राखून पराभव करत तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. 

तर सामन्यादरम्यान असं काही घडलं, ज्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. भारताच्या फलंदाजीदरम्यान, टीम इंडियाच्या डगआउटमध्ये कर्णधार रोहित शर्माने वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजसोबत असं काही केलं, ज्याचा व्हिडिओ ट्विटरवर प्रचंड व्हायरल होतोय.

रोहित शर्माने सिराजला मारली टपली!

सामन्यादरम्यान रोहित शर्माने डगआऊटमध्ये बसलेल्या वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला टपली मारल्याच कॅमेरात कैद झालं आहे. रोहित शर्माचा हा गमतीदारपणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

टीम इंडिया विजयाकडे कूच करत असताना रोहित सिराजसोबत मस्ती करत होता. याचदरम्यान कॅमेरामनने हे दृश्य टिपलं. हिटमॅन सिराजला पाठीमागून मजेशीर पद्धतीने डोक्यात गमतीने मारत असल्याचं दिसतोय.

भारताकडून न्यूझीलंडचा पराभव

या सामन्यात मोहम्मद सिराजने 1 बळी घेतला. भारताने पहिल्या T-20 सामन्यात न्यूझीलंडवर पाच विकेट्सनी मात करत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने भारताला 165 धावांचे लक्ष्य दिलं होतं. याचा पाठलाग करताना भारताने 2 चेंडू बाकी असताना 5 गडी गमावून हे लक्ष्य गाठलंय.

Read More