Rohit Sharma Funny Viral Video: आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सचा संघ काही दमदार कामगीरी करू शकला नाही. अजूनही संघाची स्थिती कमकुवत असल्याचे दिसून येत आहे. मुंबईचा पुढील सामना 13 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आहे. पण त्याआधी सराव सामन्यादरम्यानचा संघाचा एक मजेदार व्हिडीओ व्हायरल आला आहे. यामध्ये मैदानात वादळ आल्याचे दिसून येत आणि त्यात रोहित शर्मा मजा करता दिसत आहे. रोहित शर्मा संघातील इतर खेळाडूंना मैदानातून परत बोलावतानाही दिसला. त्याने त्यावेळी मजेशीर पद्धतीने कॅमेरामनलाही ऑर्डर देताना दिसत आहे. याचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मुंबईइंडियन्सचा संघ पुढच्या सामन्यासाठी सराव करत असताना मैदानात वादळ आले. सगळीकडे वारा सुटला होता. यावेळी रोहित शर्मा मैदानाबाहेर उभा राहून खेळाडूंना हाक मारताना दिसला. पार्ट बोलवताना दिसला. दरम्यान, रोहित शर्माने वादळाकडे बोट दाखवत कॅमेरामनला म्हटले, 'अअरे, तू माझ्याकडे काय घेत आहेस, तिकडे बघ....' रोहित सांगत होता की माझ्याकडे कॅमरा जाण्यापेक्षा तिकडचे दृश्य कव्हर जर. रोहितचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
ROHIT SHARMA, WHAT A CHARACTER pic.twitter.com/Ifz1YlNHX4
— Johns. (@CricCrazyJohns) April 11, 2025
2025 च्या आयपीएलमध्ये रोहित शर्मा त्याच्या फॉर्ममध्ये अजूनही दिसत नाहीये. गेल्या 4 सामन्यांमध्ये हिटमन 20 चा टप्पाही गाठू शकला नाही. पण, याआधी 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हिटमनला उत्तम लयीत पाहण्यात आले होते. आता पुढच्या सामन्यात रोहित संघासाठी मोठी खेळी खेळू शकतो की नाही हे पाहावे लागेल.
हे ही वाचा: बुर्ज खलिफामधील तब्बल 22 फ्लॅट्सचा मालक आहे 'हा' भारतीय! एका फ्लॅटची किंमत किती?
आयपीएल 2025च्या पॉइंट्स टेबलमध्ये मुंबईचा संघ 8 व्या क्रमांकावर आहे. संघाला 5 सामन्यांमध्ये फक्त एकच विजय मिळाला आहे. गेल्या सिजनमध्येही हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील संघ अपयशी ठरला होता, पुन्हा एकदा मुंबईत तीच अवस्था दिसून येत आहे. चालू सिजनमध्ये, दिल्लीचा मुंबईवर वरचष्मा असल्याचे दिसून येते.