IPL 2025 : मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात आयपीएल 2025 चा 69 वा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबईने विजयासाठी दिलेलं 185 धावांचं आव्हान पंजाब किंग्सने 7 विकेट राखून पूर्ण केलं. यासह पॉईंट्स टेबलमध्ये पंजाबनं टॉप 2 मध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. तर आयपीएल 2025 च्या पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई इंडियन्सला चौथ्या स्थानावरच समाधान मानावं लागलं. रोहित शर्मा हा अनेकदा मैदानात सह खेळाडूंच्या खोड्या काढताना दिसतो. पंजाब - मुंबई सामना संपल्यावर सुद्धा असंच घडलं. रोहितने पंजाबचा कर्णधार श्रेयसची हुबेहूब नक्कल केली. रोहित श्रेयस प्रमाणे छाती फुगवून, हात हलवत आला आणि त्याने श्रेयस अय्यरला मिठी मारली. हा व्हिडिओ मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर करण्यात आला आहे.
आयपीएल 2025 मध्ये सोमवारी 26 मे रोजी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना खेळवला जात आहे. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली. त्यामुळे मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीसाठी उतरावे लागेल. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने 7 विकेट गमावून 184 धावा केल्या. यात रोहित शर्माने मुंबईकडून फलंदाजी करताना 24 धावा केल्या.
पंजाब किंग्सने 18.3 मध्ये 187 धावा करून विजयाचं आव्हान पूर्ण केलं. यात श्रेयस अय्यरने पंजाब किंग्सकडून 26 धावा केल्या आणि तो नाबाद राहिला. यासह पंजाब किंग्सने पॉईंट्स टेंबलमध्ये गुजरातला मागे सारून पहिलं स्थान पटकावलं असून यामुळे त्यांचं प्लेऑफसाठीच टॉप २ मधील स्थान पक्कं झालं आहे. त्यामुळे पंजाबला क्वालिफायर १ सामना खेळले, यात ते पराभूत झाल्यास त्यांना फायनलमध्ये पोहोचण्यासाठी अजून एक संधी मिळेल.
मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11 : रियान रिकलटन, रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, नमन धीर, मिचेल सॅन्टनर, दीपक चहर, ट्रेन्ट बोल्ट, जसप्रीत बुमराह
पंजाब किंग्सची प्लेईंग 11 : प्रियांश आर्या, जॉश इंग्लिस, श्रेयस अय्यर, नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉयनिस, मार्को यानसन, हरप्रीत ब्रार, काईल जेमिसन, विजय कुमार वैश्यक, अर्शदीप सिंग