Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

MI ने पहिली मॅच जिंकताच कॅप्टन रोहितनं या खेळाडूला दिलं विजयाचं श्रेय

पहिल्या विजयानंतर रोहित खूश, या खेळाडूंचं तोंडभरून कौतुक

MI ने पहिली मॅच जिंकताच कॅप्टन रोहितनं या खेळाडूला दिलं विजयाचं श्रेय

मुंबई : सलग 8 सामन्यात पराभव झाल्यानंतर मुंबई टीमला विजयाचं खातं उघडण्यात अखेर यश मिळालं आहे. या यशाचा शिल्पकार आणि खरा हिरो कोण आहे याबाबत रोहित शर्मा बोलला. सामना जिंकल्याचा आनंद त्याने साजरा केला. 

रोहितने मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचं कौतुक केलं. खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. खूप चांगलं खेळले. आज खेळाडूंमधील खरी क्षमता सर्वांसमोर आली. 

ऋतिक शौकीन आणि कुमार कार्तिकेय सिंहने उत्तम कामगिरी केली. या दोघांवर ठेवलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरवला अशी प्रतिक्रिया रोहित शर्माने दिली आहे. 

मुंबई इंडियन्सने आयपीएल 2022 मध्ये राजस्थान रॉयल्सचा पाच गडी राखून पराभव करून पहिला विजय नोंदवला. याआधी मुंबईला सलग 8 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. 

यंदाच्या हंगामात मुंबई आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे. सुपरस्टार फलंदाज रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने पाचवेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.

Read More