मुंबई : पंजाब विरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबईचा 12 धावांनी पराभव झाला आहे. मुंबईला सलग पाचवा पराभव स्वीकारावा लागला आहे. या सगळ्या गोष्टी असतानाही एक व्हिडीओ मात्र सोशल मीडियावर हिट होत आहे. कर्णधार रोहित शर्माने खेळाडूची पाठ थोपटली आहे. त्याची गळाभेटही घेतली.
कर्णधार रोहित शर्माकडून ही गोष्ट प्रत्येक कर्णधारानं शिकायला हवी. रोहित शर्माने युवा स्टार खेळाडूची गळाभेट घेतली आणि त्याच सोबत त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. त्याचं कौतुक केलं त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बेबी एबीने आपल्या फलंदाजीनं सर्वांची मन जिंकली. कर्णधार रोहित शर्माच्या मनात आशेचा किरण जागा केला. त्याने राहुल चाहरच्या एका ओव्हरमध्ये 29 धावा केल्या. त्याच्या कामगिरीचं कौतुक करण्यासाठी ब्रेक टाईममध्ये स्वत: रोहित शर्मा मैदानात आला.
कर्णधार रोहित शर्माने त्याची पाठ थोपटली आणि त्याचं खूप कौतुक केलं त्याला मिठी मारली. त्याच्या जबरदस्त कामगिरीमुळे मुंबई टीमसाठी आशेचा एक किरण ठरला. मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. स्मिथने त्याला गुगली बॉल टाकून आऊट केलं.
या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ब्रेविसचं कौतुक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबई टीम 12 धावांनी हा सामना हरली. पंजाबने 12 धावांनी टीमवर विजय मिळवला आहे.
Thats how you appreciate young blood!
— Harsh (@harshhhhh17) April 13, 2022
BABY AB has arrived #MIvPBKS #RohitSharma #mipaltan #BabyAB #dewaldbrevis #MumbaiIndians # pic.twitter.com/srEaA1Yhd8