कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणाऱ्या रोहित शर्माचा (Rohit Sharma) मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून (Mumbai Cricket Association) मोठा सन्मान करण्यात आला आहे. यादरम्यान रोहितचे आई-वडील आणि पत्नी रितिका सजदेह यांच्या हस्ते रोहित शर्मा स्टँडचे अधिकृतपणे अनावरण करण्यात आले. सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, विनू मंकड आणि दिलीप वेंगसरकर यांच्यानंतर रोहित शर्माला हा मान मिळाला आहे. यानिमित्ताने रोहितने भावनिक भाषण केलं आणि नजीकच्या भविष्यात वानखेडे स्टेडियमवर भारतासाठी एकदिवसीय सामना खेळण्याची इच्छा व्यक्त केली.
रोहितने यानिमित्तान भाषण करताना म्हटलं की, "सर्वप्रथम, या कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी येथे आलेल्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो. आज जे काही घडणार आहे, त्याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. मोठं होताना, मुंबई, भारतासाठी खेळण्याची इच्छा असताना कोणीही अशा गोष्टींबद्दल विचार करत नाही. माझ्यासाठी, हे इतर कोणत्याही खेळाडूसारखे आहे जो आपले सर्वोत्तम देऊ इच्छिते. राष्ट्राची, देशाची शक्य तितकी सेवा करा. असं करताना तुम्ही खूप काही साध्य करण्याचा प्रयत्न करता. तुम्ही अनेक रेकॉर्ड रचता. पण पण असं काहीतरी खरोखरच खास असतं. वानखेडे हे एक प्रतिष्ठित स्टेडियम आहे, येथे खूप आठवणी आहेत".
#WATCH | Mumbai | At the inauguration ceremony of a stand in Wankhede to be named after him, Indian ODI men's cricket team captain Rohit Sharma says, "It will be a surreal feeling on 21st when I come here and play against Delhi Capitals, representing Mumbai Indians, and to have a… pic.twitter.com/Jw8TflEP0Y
— ANI (@ANI) May 16, 2025
"महान खेळाडू आणि जगातील मोठ्या राजकीय नेत्यांमध्ये माझे नावाचा समावेश असणं, याबद्दल माझ्या भावना मी व्यक्त करू शकत नाही. त्यासाठी मी खरोखरच आभारी आहे, सन्मानित आहे आणि सर्व एमसीए सदस्यांचा खूप आभारी आहे. अॅपेक्स कौन्सिल सदस्यांना याक्षणी विसरू नये. मी खेळत असताना मला सन्मानित केलं जाणे हे विशेष आहे. मी दोन फॉरमॅटमधून निवृत्त झालो असलो तरी अद्याप एका फॉरमॅटमध्ये खेळत आहे. 21 तारखेला मी या मैदानावर मुंबई इंडियन्सकडून दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळेन तेव्हा ही एक अविश्वसनीय भावना असेल. ही एक अतिशय खास भावना असेल," असंही रोहित म्हणाला.
पुढे त्याने सांगितलं की, "भारत जेव्हा इथे कोणत्याही संघाविरुद्ध खेळेल तेव्हा ते आणखी खास असेल. माझे आई, बाबा, पत्नी, भाऊ आणि त्याची पत्नी यांच्यासमोर हा सन्मान मिळत आहे. माझ्या आयुष्यातील सर्व लोकांचा, त्यांनी केलेल्या त्यागासाठी मी खूप आभारी आहे. अर्थात माझी टीम मुंबई इंडियन्स इथे आहे, जे माझे भाषण संपण्याची वाट पाहत आहेत जेणेकरून ते सराव सुरू करू शकतील," असंही मिश्किलपणे रोहित पुढे म्हणाला.