Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

आम्ही असेच खेळतो... पहिल्या विजयनंतर Rohit Sharma असं का म्हणाला?

वाढदिवसाच्याच दिवशी विजयाचं गिफ्ट मिळाल्याने रोहित शर्माच्या चेहऱ्यावरही आनंद झळकत होता. 

आम्ही असेच खेळतो... पहिल्या विजयनंतर Rohit Sharma असं का म्हणाला?

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी अखेर तो क्षण काल आलाच. मुंबईने यंदाच्या सिझनमध्ये पहिला विजय मिळवत 2 पॉईंट्स कमावलेत. मुंबईच्या पहिल्या विजयानंतर चाहते फार आनंदी आहेत. वाढदिवसाच्याच दिवशी विजयाचं गिफ्ट मिळाल्याने रोहित शर्माच्या चेहऱ्यावरही आनंद झळकत होता. 

राजस्थान रॉयल्स विरूद्ध मिळालेल्या पहिल्या विजयानंतर रोहित शर्मा म्हणाला, आम्ही असेच खेळतो आणि आमच्या टीममधील खेळाडूंमध्ये ही क्षमता आहे. आम्हाला माहिती होतं की, या ठिकाणी फलंदाजी करणं सोप्पं नव्हतं. मात्र आमच्या फलंदाजांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्यामुळे आम्ही हा सामना जिंकला.

कदाचित आम्ही सुरुवातीला असंच खेळलो असतो पण गोलंदाजीमध्ये काही बदल होते. या पिचवर बॉल काही वेळ थांबत होता. अशा पद्धतीच्या पिचवर आम्ही ज्या टीमसोबत खेळलो ते खूप चांगलं होतं, असंही रोहितने सांगितलं आहे.

मुंबईने आयपीएलच्या 15 व्या सिझनमधीस (IPL 2022) पहिला विजय मिळवला आहे. मुंबईने राजस्थान रॉयल्सवर 5 विकेट्सने विजय मात केली आहे. डॅनियल सॅम्सने विजयी सिक्स मारला.  राजस्थानने विजयासाठी दिलेल्या 159 धावांचं आव्हान मुंबईने 5 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. 

मुंबईकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 51 धावांची खेळी केली. तिलक वर्माने 35 रन्सचं योगदान दिलं. इशान किशनने 26 धावा केल्या. तर टीम डेव्हिडने नॉट आऊट 20 रन्स केल्या. राजस्थानकडून रवीचंद्रन अश्विन युझवेंद्र चहल, प्रसिध कृष्णा, कुलदीप सेन आणि ट्रेन्ट बोल्टने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read More