Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाचा वनडे कर्णधार रोहित शर्माने 3 मे रोजी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. यापूर्वी रोहितनं 2024 वर्ल्ड कप जिंकल्यावर टी 20 क्रिकेटमधून सुद्धा निवृत्ती घेतली होती. सध्या रोहित शर्मा केवळ वनडे फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार आहे. रोहित शर्माने (Rohit Sharma) नुकतीच एक मुलाखत दिली ज्यात तो 2023 वर्ल्ड कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या पराभवाविषयी बोलला. त्यानं सांगितलं की कशा प्रकारे तो ऑस्ट्रेलिया विरुद्ध मिळालेल्या पराभवानंतर रागात होता आणि त्या एका दिवसाचा बदला तो नेहमी मैदानावर खेळताना त्या संघाविरुद्ध घेऊ इच्छितो.
रोहित शर्माने या मुलाखतीत सांगितलं की त्याच्यासाठी आणि टीम इंडियासाठी टी 20 वर्ल्ड कप 2024 चा ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेला सामना हा भारताला फक्त सेमीफायनलमध्ये पोहोचवण्याचा नव्हता तर 2023 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेण्याचा होता. 19 नोव्हेंबर 2023 ती तारीख होती जेव्हा अहमदाबादच्या स्टेडियमवर झालेल्या वर्ल्ड कप 2023 च्या फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. मात्र 2024 च्या सेमी फायनल सामन्यात या पराभवाचा बदला घेण्याची नामी संधी ऑस्ट्रेलियाकडे होती आणि त्यात ऑस्ट्रेलियाला यश मिळालं.
हेही वाचा : 'हे बघ तुला जर...', सचिन तेंडुलकरने पृथ्वी शॉला दाखवला आरसा, स्पष्ट शब्दांत सांगितलं 'मला आता तुझ्यावर...'
रोहित शर्माने स्टार स्पोर्ट्स सोबत बोलताना सांगितले की वर्ल्ड कप 2023 फायनलमध्ये पराभूत झाल्यावर भारतीय संघ जो बाहेरून शांत दिसत होता त्याच्या मागे काय सुरु होतं. तो म्हणाला, 'मला राग नेहमीच राग असायचा. हे माझ्या मनात कुठेतरी चालूच होतं. त्यांनी आपला 19 नोव्हेंबर खराब केला आहे. आपलाच नाही तर संपूर्ण देशाचा दिवस खराब केला. त्यांच्यासाठी काहीतरी राखून ठेवले पाहिजे, म्हणजे त्यांना काही चांगली भेटही दिली पाहिजे'.
रोहित पुढे म्हणाला की, 'यासर्व गोष्टी आमच्या डोक्यात सुरु राहतात. जेव्हा मी फलंदाजी करायला मैदानात येतो तेव्हा असा विचार करत नाही की ऑस्ट्रेलियाला स्पर्धेतून बाहेर करायचं आहे. मी विचार करतो कि मला त्यांच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करायची आहे. ड्रेसिंग रूममध्ये जेव्हा टीम असते तेव्हा सर्व खेळाडूंमध्ये या गोष्टी बोलल्या जातात. आमच्या सगळ्यांमध्ये मजा मस्ती सुरु असते की ऑस्ट्रेलियाला स्पर्धेतून बाहेर काढायचंय, त्यांना बाहेर करून मजा येईल'.