Yashavi Jaiswal : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज यशस्वी जयस्वालने (Yashavi Jaiswal) यावर्षी त्याची देशांतर्गत क्रिकेटमधला मुंबई क्रिकेट संघ (Mumbai Cricket Team) सोडण्याचा निर्णय घेतला होता. यशस्वी मुंबई संघाची साथ सोडून गोवा संघासोबत खेळणार होता, यासाठी त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून एनओसी सुद्धा मागितली होती. पण काही दिवसांनी त्याने या निर्णयावरून यू-टर्न घेतला आणि मुंबई संघासोबतच भविष्यात खेळणार असल्याचं सांगितलं. आता यशस्वीच्या या निर्णयाबाबत मोठा खुलासा समोर आला आहे. असं म्हटलं जातंय की रोहित शर्माच्या (Rohit Sharma) सांगण्यावरून यशस्वीने याबाबतचा निर्णय घेतला होता.
मुंबई मिररच्या एका रिपोर्टनुसार, भारताचा वनडे कर्णधार रोहित शर्माने यशस्वी जयस्वाल सोबत बोलणं केलं. त्याने यशस्वीला मुंबई संघ सोडण्यापासून रोखले. रोहितने यशस्वीला समजावलं की, करिअरच्या या टप्प्यावर असताना त्याने त्याचा देशांतर्गत क्रिकेट संघ बदलणं योग्य नाही. तसेच भारतीय संघासाठी खेळण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण करण्यात मुंबई संघाची भूमिका याबाबत आठवण करून दिली. त्यानंतर यशस्वीने त्याचा निर्णय बदलला.
एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी या रिपोर्टचा हवाला देत म्हटले की, 'रोहितने यशस्वीला त्याच्या करिअरमधील या टप्प्यावर मुंबई संघासोबत राहण्यास सांगितले. रोहितने त्याला समजावले की मुंबईसारख्या टीमसाठी खेळणं खूप गर्व आणि प्रतिष्ठेची गोष्ट आहे. मुंबईने आतापर्यंत रेकॉर्ड ब्रेक 42 वेळा रणजी ट्रॉफी जिंकली आहे. रोहितने यशस्वीला असेही सांगितले की त्याने हे विसरू नये की मुंबई क्रिकेटमुळेच त्याला त्याची प्रतिभा दाखविण्याचे आणि भारतासाठी खेळण्याचे व्यासपीठ मिळाले आणि यासाठी त्याने या शहराचे आभार मानले पाहिजेत. यशस्वीने सुरुवातीला मुंबईच्या मैदानांवर खेळायला सुरुवात केली आणि नंतर त्याची मुंबई संघाच्या सर्व वयोगटातील संघांमध्ये निवड झाली'.
हेही वाचा : सिराजच्या परफॉर्मन्समुळे इनसिक्योर झाला बुमराह? पोस्टमध्ये उल्लेख टाळला, सोशल मीडियावर झाला ट्रोल
FAQ :
1. यशस्वीने त्याचा निर्णय का बदलला?
यशस्वीने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या सल्ल्यानंतर मुंबई संघ सोडण्याचा निर्णय मागे घेतला आणि मुंबईसोबतच खेळण्याचा निर्णय घेतला.
2. रोहित शर्माने यशस्वीला मुंबईबद्दल काय सांगितले?
रोहितने यशस्वीला सांगितले की, मुंबईसारख्या संघासाठी खेळणे ही गर्व आणि प्रतिष्ठेची बाब आहे. तसेच, मुंबई क्रिकेटमुळे त्याला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली, यासाठी त्याने या शहराचे आभार मानले पाहिजेत.
3. यशस्वी जयस्वाल सध्या कोणत्या संघासोबत खेळणार आहे?
यशस्वी जयस्वाल आता मुंबई क्रिकेट संघासोबतच देशांतर्गत क्रिकेट खेळणार आहे.