Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

रोहित आणि विराट पुन्हा मैदानात दिसणार? 'या' दौऱ्यावर जाणार भारतीय संघ, BCCI ने जाहीर केले वेळापत्रक

 Rohit Sharma & Virat Kohli to return to England: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गुरुवारी भारताच्या इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले. या दरम्यान, दोन्ही संघांमध्ये 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने आणि 3 एकदिवसीय सामने खेळले जातील.  

रोहित आणि विराट पुन्हा मैदानात दिसणार? 'या' दौऱ्यावर जाणार भारतीय संघ, BCCI ने  जाहीर केले वेळापत्रक

IND vs ENG once again in July 2026: भारतीय क्रिकेटप्रेमींना पुन्हा एकदा विराट कोहली आणि रोहित शर्माच्या जोडीची झलक पाहायला मिळणार आहे. बीसीसीआयने (BCCI)  इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. या दौऱ्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 टी20 आणि 3 वनडे सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यामध्ये भारताचे स्टार खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळताना दिसू शकतात. 

कधी पासून सुरु होणार टी20 मालिका? 

टी20 मालिकेची सुरुवात 1 जुलै 2026 पासून होणार असून ही मालिका 11 जुलै 2026 पर्यंत खेळवली जाईल. पाच सामन्यांची ही मालिका खालीलप्रमाणे होणार आहे:

1 जुलै: पहिला टी20 – डरहम

4 जुलै: दुसरा टी20 – मँचेस्टर

7 जुलै: तिसरा टी20 – नॉटिंगहॅम

9 जुलै: चौथा टी20 – ब्रिस्टल

11 जुलै: पाचवा टी20 – साउथॅम्प्टन

हे ही वाचा: भारताने FIDE Women’s Chess World Cup मध्ये रचला इतिहास! दिव्या देशमुखनंतर कोनेरू हम्पीनेही गाठला अंतिम टप्पा

 

वनडे मालिका कधीपासून सुरु होणार? 

वनडे मालिका 14 जुलै 2026 पासून सुरु होणार आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेतील सामने पुढील ठिकाणी पार पडतील:

14 जुलै: पहिला वनडे – बर्मिंगहॅम

16 जुलै: दुसरा वनडे – कार्डिफ (सोफिया गार्डन्स)

19 जुलै: तिसरा वनडे – लॉर्ड्स, लंडन

हे ही वाचा: 'टी'ब्रेकमध्ये क्रिकेटर्स खरंच चहा पितात? स्टार क्रिकेटरने केला खुलासा

 

रोहित आणि विराट पुन्हा मैदानात दिसणार?

वनडे संघाचे कर्णधारपद सध्या रोहित शर्माकडे आहे आणि  विराट कोहलीने अद्याप वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली नाही. त्यामुळे या दौऱ्यात दोन्ही दिग्गज खेळाडू सहभाग घेण्याची शक्यता प्रबळ आहे. दोघेही शेवटचं एकत्र 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात दिसले होते. त्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला पराभूत करत विजेतेपदावर मोहोर उमटवली होती.

वनडे संघाचं नेतृत्व अजूनही रोहितकडे; विराटही फॉर्ममध्ये

सध्या भारतीय वनडे संघाचं कर्णधारपद रोहित शर्माकडे आहे आणि विशेष म्हणजे विराट कोहलीनेही वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली नाही. त्यामुळे येत्या इंग्लंड दौऱ्यात होणाऱ्या वनडे मालिकेत हे दोन्ही दिग्गज पुन्हा एकदा मैदानात उतरतील, अशी जोरदार शक्यता आहे. रोहित आणि विराट यांची जोडी अखेरचं एकत्र दिसली होती ती 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत, जिथे भारताने न्यूझीलंडला पराभूत करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केलं होतं. तो सामना केवळ ट्रॉफीसाठी नव्हता, तर दोघांनीही पुन्हा एकदा आपली क्लास दाखवली होती. भारताने याआधी 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती, आणि त्यानंतर तब्बल 12 वर्षांनी 2025 मध्ये पुन्हा एकदा हा किताब आपल्या नावे केला.

हे ही वाचा: IND vs ENG: मँचेस्टरमध्ये शुभमन गिलसोबत अपमानास्पद प्रकार, इंग्लिश प्रेक्षकांनी केले 'हे' वाईट कृत्य

या भन्नाट वेळापत्रकासह 2026 जुलैमध्ये क्रिकेटचा उत्साह वाढलेला दिसणार आहे. विराट आणि रोहित पुन्हा मैदानात असल्यामुळे ही मालिका चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे.

 

 

Read More