Rohit Sharma Wife Ritika Sajdeh About Dhanashree Verma: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी ऋतिका सजदेह सध्या एका पोस्टमुळे चर्चेत आहे. आयपीएल सुरु होण्याच्या एक दिवस आधी फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि युट्यूबर धनश्री वर्मा यांचा घटस्फोटावर शिक्कामोर्तब झालं. दोघेही विभक्त झाल्यानंतर सोशल मीडियावरुन धनश्रीवर टीकेची झोड उठताना दिसत आहे. अशातच सोशल मीडियावरील अनेक पोस्टमध्ये धनश्रीला 'गोल्ड डिगर' म्हणजेच पैशांसाठी पुरुषाला फसवणारी असं म्हटलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे अशाच एका पोस्टला ऋतिकाने लाइक केलं आहे.
20 मार्च रोजी धनश्री आणि चहल यांचा घटस्फोट मुंबईतील कौटुंबिक न्यायालयात झाला. धनश्रीने चहलकडून 4 कोटी 75 लाखांची पोटगी घेतल्याच्या मुद्द्यावरुन धनश्रीवर टीका केली जात आहे. एकीकडे हा सारा ड्रामा सुरु असतानाच दुसरीकडे शुभांकर मिश्राचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये त्याने धनश्रीवर निशाणा साधला आहे. या व्हिडीओमध्ये धनश्रीला गोल्ड डिगर म्हणजेच पैशांसाठी पुरुषांना फसवणारी असं संबोधण्यात आलं आहे. ऋतिकाने धनश्रीला पैशांसाठी पुरुषांना फसवणारी म्हटल्याची शुभांकरच्या व्हिडीओची ही पोस्ट लाइक केल्याचं अनेक चाहत्यांनी अधोरेखित केलं आहे. ऋतिकाने ही पोस्ट लाइक केल्याचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले आहेत.
या व्हिडीओमध्ये शुभांकर मिश्राने, "धनश्रीला तिचं दुसरं आयुष्य सुरु करण्यासाठी फार अडचणींचा सामना करावा लागला," असं म्हटलं आहे. मात्र त्यावेळी धनश्रीने घटस्फोट घेताना पोटगी घेतल्याने तिने आता स्वत:ला 'सेल्फ मेड वुमन' म्हणून नये असंही शुभांकरने म्हटलं आहे. अन्य एका व्हिडीओमध्ये शुभांकरने चहल जे टी-शर्ट परिधान करुन कोर्टात घटस्फोट घेण्यासाठी गेलेला त्यावरील मजकुराकडे लक्ष वेधलं. "बी युआर ओन शुगर डॅडी" असं चहलच्या टी-शर्टवर लिहिलेलं दिसल्यानंतर शुभांकरने, "तुझी खिल्ली उडवण्यासाठीच चहलने हे टी-शर्ट परिधान केलं होतं," असं म्हटलं. नैतिकता न पाळता धनश्रीने सक्षम असूनही पोटगी घेतल्याच्या मुद्दावर शुभांकरचा आक्षेप होता हे व्हिडीओतून दिसून येते.
दुसरीकडे सोशल मीडियावर धनश्रीला 'गोल्ड डिगर' म्हणजेच पैशांसाठी पुरुषाच्या नादी लागलेली स्री असा उल्लेख असलेली शुभांकरची व्हिडीओ पोस्ट ऋतिकाने लाईक केल्याचा स्क्रीनशॉर्ट व्हायरल होत आहे. या पोस्टला ऋतिकाने लाईक केलं असल्याने तिने चहलच्या घटस्फोटावर थेट कमेंट केली नसली तरी धनश्रीवर पैसे घेतल्याच्या आरोपाशी ऋतिका सहमत असल्याची चर्चा आहे. ऋतिकाच्या या लाईकमुळे धनश्री चूक की बरोबर यावरुन पुन्हा चर्चा सुरु झाल्याचं दिसून येत आहे.
चहल आणि धनश्री या दोघांचं 2020 मध्ये लग्न झालं. दोघे मागील दीड वर्षांपासून वेगवेगळे राहत होते. चहलच्या वकिलाने माहिती देताना, कोर्टाने घटस्फोट मंजूर केला असून दोघे आता पती-पत्नी नाही असं प्रसारमाध्यमांना सांगितलं होतं.
या साऱ्या गोंधळात धनश्रीने तिच्या गाण्याचा नवा व्हिडीओ शेअर केला असून या गाण्याचा व्हिडीओ घटस्फोटाच्या दिवशीच धनश्रीने सार्वजनिक केला. गाण्यामध्ये पती पत्नीच्या नात्यामध्ये दुरावा कसा वाढत जातो असे कथानक दाखवण्यात आलं आहे. अनेकांनी हे गाणं धनश्रीच्या आयुष्यावर आधारित असल्याचा दावा केला आहे. धनश्रीला घटस्फोटाबद्दल विचारण्यात आलं असता तिने 'गाणं ऐका आधी' असं उत्तर दिलं होतं.