Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

महिला चाहत्याला बघून रोहित शर्माने थांबली कार आणि... बघा viral video

Rohit Sharma To Fan Girl:  रोहित शर्माचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा रस्त्याच्या मधोमध एका महिला चाहत्याला बघून थांबलेला दिसत आहे. 

महिला चाहत्याला बघून रोहित शर्माने थांबली कार आणि... बघा viral video

Rohit Sharma: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा नेहमीच चर्चेत असतो. नुकताच रोहितने बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत उत्तम केलं केला. आता भारत विरुद्ध न्यूझीलंड या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी रोहितने तयारी सुरू केली आहे. याच दरम्यान टीम इंडियाच्या कर्णधाराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो महिला चाहत्याला बघून रस्त्याच्या मधोमध कार थांबत आहे. 

नक्की काय झालं?

भारतीय कर्णधाराचा व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये तो रस्त्याच्या मधोमध कार थांबून एका महिला चाहत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे.
व्हिडीओमध्ये दिसून येत आहे की रोहित शर्मा करोडो रुपयांच्या लॅम्बोर्गिनी उरूस चालवत आहे. रोहितला गाडीमध्ये त्याचे चाहते थांबतात. यावेळी एक महिला चाहती रोहितकडे येते इतक्यात मागून आवाज येतो की तिचा वाढदिवस आहे. मग रोहित रस्त्याच्या मधोमध त्याच्या चाहतीला हात मिळवून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. यानंतर त्या महिला चाहतीची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.

हिटमॅनची लॅम्बोर्गिनी उरूस

भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्मा अनेकदा मुंबईच्या रस्त्यांवर लॅम्बोर्गिनी उरूस चालवताना दिसतो.  हिटमॅनच्या या कारची किंमत जवळपास 3.10 कोटी रुपये आहे. या कारबद्दल खास गोष्ट म्हणजे या कारचा क्रमांक 0264 आहे, जो रोहित शर्माचा वनडे आणि विश्वविक्रमातील सर्वोच्च धावसंख्या अर्थात 264 धावा आहे.

 

रोहित शर्माचं आंतरराष्ट्रीय कारकीर्द 

रोहित शर्माने 2024 T-20 विश्वचषक जिंकल्यानंतर T20 आंतरराष्ट्रीयमधून निवृत्तीची घोषणा केली होती. आता रोहित टीम इंडियासाठी फक्त एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट खेळत आहे. रोहितने आजवरच्या त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 61 कसोटी आणि 265 एकदिवसीय सामने खेळले आहेत. याशिवाय त्याने 159 T-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. रोहितने कसोटीत ४१७९ धावा आणि वनडेमध्ये १०८६६ धावा केल्या आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय T-20मध्ये त्याने 4231 धावा केल्या आहेत.

Read More