Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

रोहित शर्माने फिटनेससाठी बनवला मास्टर प्लॅन, 'मिशन वर्ल्ड कप 2027' ला करणार सुरुवात!

ODI World Cup 2027 : रोहितने आयसीसीच्या तीन पैकी दोन टूर्नामेंटच्या ट्रॉफी त्याच्या नेतृत्वात भारताला जिंकवून दिल्या आहेत, तेव्हा आता वनडे वर्ल्ड कप सुद्धा नावावर करण्यासाठी रोहित तयारीला लागणार असल्याची माहिती मिळतेय. 

रोहित शर्माने फिटनेससाठी बनवला मास्टर प्लॅन, 'मिशन वर्ल्ड कप 2027' ला करणार सुरुवात!

ODI World Cup 2027 : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वात टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे (Champions Trophy 2025) विजेतेपद पटकावले. टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या विजयानंतर रोहित शर्माने टी 20 फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. 37 वर्षांचा रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलनंतर वनडे फॉरमॅटमधून सुद्धा निवृत्ती घेईल अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र रोहितने तो निवृत्ती घेणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे रोहितचं पुढील मिशन वर्ल्ड कप 2027 आहे का याबाबत अंदाज लावला जातोय. रोहितने आयसीसीच्या तीन पैकी दोन टूर्नामेंटच्या ट्रॉफी त्याच्या नेतृत्वात भारताला जिंकवून दिल्या आहेत, तेव्हा आता वनडे वर्ल्ड कप सुद्धा नावावर करण्यासाठी रोहित तयारीला लागणार असल्याची माहिती मिळतेय. 

फिटनेसवर काम करणार रोहित : 

रोहित शर्मा काही महिन्यानंतर 38 वर्षांचा होईल तर वनडे वर्ल्ड कप 2027 मध्ये त्याचं वय 40 वर्षांचं असेल. अशात सर्वात मोठा प्रश्न हा त्याच्या फिटनेसचा आहे. ज्यामुळे रोहित अनेकदा ट्रॉलर्सच्या रडारवर येत असतो. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या एका महिला नेत्याने रोहितच्या फिटनेसबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे आता रोहित शर्मा त्याच्या फिटनेसबाबत मास्टर प्लान बनवणार आहे.  

हेही वाचा : KKR ने व्यंकटेश अय्यरला वगळून अजिंक्य रहाणेला कर्णधार का केलं? फ्रेंचायझीच्या CEO ने सांगितलं कारण

 

रोहित अभिषेक नायरची घेणार मदत : 

क्रिकबजच्या रिपोर्टनुसार रोहित शर्मा त्याच्या फिटनेसवर आणि फलंदाजीवर येत्या काळात अधिक काम करण्यासाठी टीम इंडियाचा सहाय्यक कोच अभिषेक नायरसोबत काम करणार असून याबाबत प्लान बनवत आहे. रिपोर्टनुसार रोहित भविष्याबाबत अनेक निर्णय आगामी आयपीएल 2025 मध्ये त्याचा परफॉर्मन्स कसा राहतो यावर अवलंबून असतील. 

2027 बाबत काय म्हणाला रोहित? 

कर्णधार रोहित शर्माने वर्ल्ड कप 2027 बाबत म्हटले होते की, सध्या तो त्याबाबत विचार करत नाहीये. पुढील काळात याबाबत विचार केला जाईल. रोहितने तो वर्ल्ड कप 2027 खेळणार की नाही याबाबत काहीही सांगितले नाही. परंतु त्याने याबाबत स्पष्ट केलं की तो एवढ्यात निवृत्त होणार नाही. 

Read More