Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2025 ची ट्रॉफी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच उचलणार? जुळून येतोय हा खास योगायोग

IPL 2025 : आरसीबी जवळपास 9 वर्षांनी आयपीएल फायनलमध्ये पोहोचली आहे. यापूर्वी तीनवेळा आरसीबी फायनलमध्ये पोहोचली होती, मात्र त्यांना विजय मिळाला नाही. परंतु यंदा असे काही खास योगायोग जुळून आले आहेत ज्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएल 2025 ची ट्रॉफी उचलणार हे जवळपास निश्चित मानलं जातंय. 

IPL 2025 ची ट्रॉफी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच उचलणार? जुळून येतोय हा खास योगायोग

IPL 2025 : आयपीएल 2025 चा क्वालिफायर 1 सामना गुरुवार 29 मे रोजी पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Punjab Kings VS Royal Chellengers Bengluru) यांच्यात खेळवला गेला.  महाराजा यादविंद्र सिंह इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम पंजाब येथे हा सामना पार पडला असून यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने क्वालिफायर 1 सामन्यात 8 विकेटने पंजाबवर विजय मिळवला. आरसीबीने हा सामना अवघ्या 10 ओव्हर्समध्ये जिंकत आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. आरसीबी जवळपास 9 वर्षांनी आयपीएल फायनलमध्ये पोहोचली आहे. यापूर्वी तीनवेळा आरसीबी फायनलमध्ये पोहोचली होती, मात्र त्यांना विजय मिळाला नाही. परंतु यंदा असे काही खास योगायोग जुळून आले आहेत ज्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएल 2025 ची ट्रॉफी उचलणार हे जवळपास निश्चित मानलं जातंय. 

आरसीबीकडे मोठी संधी : 

आयपीएलमध्ये एक आगळावेगळा रेकॉर्ड आहे, आयपीएल 2011 पासून स्पर्धेत प्लेऑफचा फॉरमॅट आला. त्यानंतर अधिकतर क्वालिफायर 1 जिंकणारा संघच आयपीएल ट्रॉफी जिंकतो. अशातच यावेळी क्वालिफायर 1 सामन्यात आरसीबीने पंजाबचा पराभव करून फायनलमध्ये आपलं स्थान पक्कं केलं आहे. त्यामुळे असं मानलं जातं आहे की, आयपीएल 2025 ची ट्रॉफी आरसीबीचं जिंकणार आहे. IPL प्लेऑफच्या इतिहासात 14 पैकी 11 वेळा असं झालं आहे, जेव्हा क्वालिफायर 1 च्या विजेत्यानेच ट्रॉफी जिंकलीये. परंतु मुंबई इंडियन्स ही एकमेव अशी टीम आहे ज्यांनी दोनदा क्वालिफायर 1 सामन्यात पराभूत होऊन सुद्धा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. 

आयपीएल प्लेऑफच्या इतिहासात सनरायजर्स हैदराबाद हा एकमेव असा संघ आहे ज्याने वर्ष 2016 मध्ये एलिमिनेटर सामना खेळून पुढे आयपीएल ट्रॉफीपर्यंतचा यशस्वी प्रवास केला होता. त्यामुळे आरसीबीच्या संघाकडे फायनल जिंकण्यासाठी एक चांगली संधी आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने आतापर्यंत एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही. 

हेही वाचा : 'अरे हा तर पाणी....' विराटने पदार्पण करणाऱ्या 'या' मुंबईकर खेळाडूची उडवली खिल्ली, Video पाहून नेटकरी भडकले

RCB ने रचला इतिहास : 

पंजाब किंग्सने प्लेऑफमधील क्वालिफायर 1 सामन्यात विजयासाठी 102 धावांचं दिलेलं टार्गेट आरसीबीने अवघ्या 10 ओव्हर्समध्ये पूर्ण केलं. अशी कामगिरी करणारा आरसीबी संघ आयपीएलच्या इतिहासातील पहिला संघ ठरला. यापूर्वी कोणत्याही संघाने प्लेऑफ सामन्यात जवळपास 10 ओव्हर्स शिल्लक ठेऊन विजय मिळवला नव्हता. त्यामुळे 10 ओव्हर्स शिल्लक असताना आयपीएल प्लेऑफमधील हा सर्वात मोठा विजय आहे. 

Read More