Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2022, RR vs MI | जोस बटलरचा तडाखा, मुंबईला विजयासाठी 159 धावांचं आव्हान

 राजस्थान रॉयल्सने (Rajsthan Royals) मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) विजयासाठी 159 धावांचे आव्हान दिले आहे. 

IPL 2022, RR vs MI | जोस बटलरचा तडाखा, मुंबईला विजयासाठी 159 धावांचं आव्हान

नवी मुंबई : राजस्थान रॉयल्सने (Rajsthan Royals) मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) विजयासाठी 159 धावांचे आव्हान दिले आहे. राजस्थानने 20 ओव्हरमध्ये  6 विकेट्स गमावून 158 धावा केल्या. राजस्थानकडून जॉस बटलरने  67 धावांची वादळी खेळी केली. रवीचंद्रन अश्विनने 21 रन्स केल्या. तर देवदत्त पडीक्कल, कॅप्टन संजू सॅमसन आणि डेरल मिचेल या तिघांनी अनुक्रमे 15, 16 आणि 17 धावा केल्या. (rr vs mi ipl 2022 rajsthan royals set 159 runs winning target for mumbai indians jos buttler fifty) 

तर मुंबईकडून हृतिक शौकीन आणि रिले मेरेडीथ या दोघांनी  प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.  तर डॅनियल सॅम्स आणि कुमार  कार्तिकेय या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. 

राजस्थानची प्लेइंग इलेव्हन :

संजू सॅमसन (कर्णधार), जॉस बटलर, देवदत्त पडिक्कल, आर. अश्विन, डॅरिल मिचेल, रियान पराग, शिमरोन हेटमायर, ट्रेन्ट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, युजवेंद्र चहल आणि कुलदीप सेन. 

मुंबईची प्लेइंग इलेव्हन : 

रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन, टिम डेव्हिड, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, डॅनियल सॅम्स, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, जसप्रीत बुमराह आणि रिले मेरेडिथ.  

Read More