Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

धोनीसाठी CSK ने काढली ऋतुराजची विकेट? 'हा' Video Viral झाल्यावर चाहत्यांना पडला प्रश्न

Ruturaj Gaikwad Viral Video: चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला जेव्हा कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे आयपीएलच्या चालू सिजनमधून बाहेर पडला. पण आता त्याचा फुटबॉल खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.   

धोनीसाठी CSK ने काढली ऋतुराजची विकेट? 'हा' Video Viral झाल्यावर चाहत्यांना पडला प्रश्न

Ruturaj Gaikwad Plying Football: अलीकडेच चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ला इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 मध्ये मोठा धक्का बसला आहे. कारण सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाड  (Ruturaj Gaikwad) दुखापतीमुळे उर्वरित सीजनमधून बाहेर पडला आहे. ऋतुराज गायकवाडच्या दुखापतीनंतर, सीएसकेने पुन्हा एकदा एमएस धोनीला (MS Dhoni) कर्णधार बनवले आहे. या निर्णयामुळे धोनीचे चाहते खूश झाले. पण आता व्हायरल झालेल्या एका व्हिडीओने असे प्रश्न उपस्थित केले आहेत की ऋतुराज खरोखरच जखमी आहे का? धोनीला कर्णधार बनवण्यासाठी ऋतुराजला बाहेर काढले गेले का?. असे प्रश्न उपस्थित होण्यामागचे कारण म्हणजे  दुखापत झाल्यानंतर त्याचा फुटबॉल खेळतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. यामुळे हे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

व्हिडीओमुळे नवा वाद निर्माण झाला आहे

या हंगामात सलग चार सामने गमावल्यानंतर, धोनीच्या कर्णधारपदी निवडीमुळे सीएसके चाहत्यांमध्ये काही आशा निर्माण झाली होती, परंतु गायकवाडच्या एका व्हिडीओमुळे आता एक नवा वाद निर्माण झाला आहे. गायकवाड आधीच स्पर्धेतून बाहेर पडला आहे, पण त्याचा फुटबॉल खेळतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ अलीकडील आहे की जुना आहे याची पुष्टी झालेली नाही. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की ऋतुराज गायकवाड सीएसकेच्या सरावादरम्यान फुटबॉल खेळताना दिसत आहे. 

हे ही वाचा: KKR विरुद्धच्या पराभवाला कोण जबाबदार? पाचव्या पराभवानंतर धोनीने दिली प्रतिक्रिया, म्हणाला "आज मला जाणवले की..."

नेटीझन्सने विचारले प्रश्न 

हा व्हायरल व्हिडीओ बघून अनेक चाहते खेळाडूच्या दुखापतीबद्दल प्रश्न विचारत आहेत. त्याच्या हातात एल्बो गार्ड बांधलेला आहे पण तो फुटबॉल खेळताना रिलॅक्स दिसत आहे. एका चाहत्याने विचारले: "जबरदस्तीने ड्रॉप केले का?" दुसऱ्या चाहत्याने दावा केला की, "जुना व्हिडीओ." एवढंच की यावर काही मिम्ससुद्धा बनले आहे. 

हे ही वाचा: 'अरे, तू माझ्याकडे काय घेत आहेस, तिकडे बघ ..' रोहित शर्माने कॅमेरामॅनलाच दिली ऑर्डर, मजेशीर Video Viral

 

हे ही वाचा: काय सांगता! वयाच्या 64 व्या वर्षी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, इतिहास घडवणारी जोआना चाइल्ड आहे तरी कोण?

पॉइंट टेबलमध्ये कितव्या क्रमांकावरआहे चेन्नई? 

पाच वेळा आयपीएल विजेते असलेले हे संघ सध्या पॉइंट टेबलमध्ये नवव्या स्थानावर आहेत. आयपीएल 2025 मध्ये सीएसकेची सुरुवात चांगली झाली. त्यांनी स्पर्धेतील पहिल्या सामन्यात त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सचा पराभव केला पण त्यानंतर संघ जिंकण्यात अपयशी ठरला. ६ सामने खेळल्यानंतर, संघाला 5 पराभवांना सामोरे जावे लागले आहे ज्यामध्ये सलग चार पराभव झाले आहेत. 

Read More