Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Video:शर्यती दरम्यान पायातून बूट निसटला,पण पुढे काय झाले पाहा

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तूफान व्हायरल होतोय. यामध्ये शर्यतीत मध्येच बूट पायातून निसटतो, मात्र हार न मानता शाळकरी मुलगी अखेर शर्यत जिंकूनच दाखवते. तिच्या या व्हिडीओची खूप चर्चा रंगली असून नेटकऱ्यांना तो प्रेरणा देतोय.  

 Video:शर्यती दरम्यान पायातून बूट निसटला,पण पुढे काय झाले पाहा

मुंबई : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तूफान व्हायरल होतोय. यामध्ये शर्यतीत मध्येच बूट पायातून निसटतो, मात्र हार न मानता शाळकरी मुलगी अखेर शर्यत जिंकूनच दाखवते. तिच्या या व्हिडीओची खूप चर्चा रंगली असून नेटकऱ्यांना तो प्रेरणा देतोय.  

व्हायरल व्हिडिओत काय ? 

२०० मीटर धावण्याची शर्यत सूरू होती. या शर्यतीच्या मध्येच शाळकरी मुलीचे पायातून बूट निघून जातो. आता तिला शर्यत पुर्ण करावी की बूट घालावा हा प्रश्न पडला होता.कारण जर बूट घातला तर वेळ वाया जाईल आणि जर थेट धावायला सूरूवात केल्यास वेळ वाचेल. मात्र ती क्षणाचाही वेळ न लावता बूट घालत पुन्हा शर्यतीत सुरूवात करते.

आणि सर्व स्पर्धकांना मागे सोडत शर्यत जिंकून दाखवते. तिच्या या कामगिरीचे सर्व स्तरावरून कौतूक होतेय.  

शर्यत जिंकणाऱ्या या शाळकरी मुलीचे नाव ले ले (Lay Lay) होते.  ती प्रोफेशनल मुक्केबाज टेरेन्स क्रॉफर्ड (Terence Crawford) याची मुलगी आहे. तिच्या या व्हिडिओ वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच अनेकांसाठी हा व्हिडिओ प्रेरणादायी ठरतो.  

Read More