IPL 2025 : आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपरकिंग्स आतापर्यंत 5 पैकी 4 सामने गमावले असून सध्या ते पॉईंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानी आहेत. नव्या सीजनमध्ये अशी अवस्था असतानाच चेन्नई सुपरकिंग्सला आता मोठा झटका बसलाय. कर्णधार ऋतुराज गायकवाड याला दुखापत झाल्याने तो संपूर्ण सीजनमधून बाहेर पडलाय. सीएसके फ्रेंचायझीने अधिकृतपणे ही माहिती शेअर केली असून यासोबतच उर्वरित सीजनसाठी नव्या कर्णधाराची सुद्धा घोषणा केली आहे.
चेन्नई सुपरकिंग्सचा हेड कोच स्टीफन फ्लेमिंग याने गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की ऋतुराज गायकवाडला गुवाहाटीमध्ये दुखापत झाली होती. तो दुखापतीसह खेळत होता. आम्ही त्याचा एक्स-रे काढला, परंतु त्यात सगळं स्पष्ट झालं नाही. मग आम्ही एमआरआय सुद्धा काढला आणि ज्यात समजलं की त्याच्या कोपऱ्यात फ्रॅक्चर आहे. आम्ही खूप निराश झालो, पण त्याने संघासाठी जे प्रयत्न केले त्याचं आम्हाला खूप कौतुक आहे. आता तो या दुखापतीमुळे संपूर्ण सीजनमधून बाहेर होत आहे. आमच्याकडे अनकॅप्ड खेळाडू म्हणून एम एस धोनी आहे जो आयपीएल 2025 मध्ये उर्वरित सामन्यात संघाचं नेतृत्व करेल.
OFFICIAL STATEMENT
Chennai Super Kings (ChennaiIPL) April 10, 2025
Ruturaj Gaikwad ruled out of the season due to a hairline fracture of the elbow.
MS DHONI TO LEAD.
GET WELL SOON, RUTU WhistlePodu Yellove pic.twitter.com/U0NsVhKlny
WhistlePodu #Yellove pic.twitter.com/H3Wqm6AdGt
Chennai Super Kings (ChennaiIPL) April 10, 2025
ऋतुराज गायकवाड हा कर्णधार असण्यासोबतच सीएसकेचा स्टार फलंदाज सुद्धा होता. मात्र 30 मार्च रोजी राजस्थान विरुद्ध सामन्यात त्याला दुखापत झाली. तुषार देशपांडेने टाकलेला एक बॉल शॉर्ट ऑफ गुड लेंथपेक्षा जास्त उसळला आणि ऋतुराजच्या डाव्या हाताला लागला. 5 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सामन्यात ऋतुराज खेळणार की नाही याबाबत संशय होता, परंतु त्याने सामना खेळला, तसेच त्यानंतर मंगळवारी पंजाब किंग्स विरुद्ध सामन्यात सुद्धा त्याने फलंदाजी केली. आता ऋतुराज स्पर्धेतून बाहेर झाल्याने चेन्नई सुपरकिंग्सची बॅटिंग लाईनअप कमजोर होऊ शकते. आता सीएसकेला त्यांच्या प्लेईंग 11 मध्ये बदल करावा लागेल.