Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

श्रीसंतवर पुन्हा एकदा बंदी! संजू सॅमसनला सपोर्ट करणे पडले महागात, झाली मोठी कारवाई

S. Sreesanth banned: माजी भारतीय वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतला नवीन अडचणीत सापडला आहे. त्याच्यावर आता तीन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.  

श्रीसंतवर पुन्हा एकदा बंदी! संजू सॅमसनला सपोर्ट करणे पडले महागात, झाली मोठी कारवाई

S. Sreesanth suspended by KCA for 3 years:  माजी भारतीय गोलंदाज श्रीशांतला पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. यावेळी याचे कारण संजू सॅमसन (sreesanth and sanju samson controversy)  हा खेळाडू आहे. श्रीशांतवर आता तीन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी केरळ क्रिकेट असोसिएशनने (केसीए) ने घातली आहे. संजू सॅमसनला चॅम्पियन्स ट्रॉफीमधून वगळण्यात आले तेव्हा त्याने त्याच्या समर्थनार्थ एक विधान केले होते. त्यावरून केसीएने त्याच्या विधानाला वादग्रस्त आणि अपमानास्पद म्हणत त्याच्यावर तीन वर्षांची बंदी घातली आहे.

नक्की काय झालं?

श्रीशांत सध्या केरळच्या कोल्लम आर्यन फ्रँचायझी संघाचा सह-मालक आहे. संजूमुळे झालेल्या या वादामुळे श्रीशांतसह कोल्लम, अलाप्पुझा लीड आणि अलाप्पुझा रिपल्स संघांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यावर फ्रँचायझी संघांनी समाधानकारक उत्तरे दिली.  यामुळे त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात आली नाही. परंतु, एका निवेदनात म्हटले आहे की, 'फ्रँचायझी संघांनी नोटीसला समाधानकारक उत्तर दिले असल्याने, त्यांच्यावर पुढील कोणतीही कारवाई केली जाणार नाही. तथापि, संघ व्यवस्थापनातील सदस्यांची नियुक्ती करताना अधिक काळजी घेण्याचा सल्ला देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.' 30 एप्रिल रोजी कोची येथे झालेल्या केसीएच्या विशेष सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला.

हे ही वाचा: बायकोच्या वाढदिवशी 'या' अभिनेत्रीचा फोटो लाईक करणे विराट कोहलीला पडले महागात, द्यावे लागले स्पष्टीकरण

 

काय म्हणाला होता श्रीशांत? 

श्रीसंतने एका मल्याळम टीव्ही चॅनेलवरील चर्चेदरम्यान संजू सॅमसन आणि केसीएविरुद्ध विधाने केली होती. यावरून केसीएचे म्हणणे आहे की, 'श्रीशांतला नोटीस सॅमसनला दिलेल्या पाठिंब्यामुळे नाही तर असोसिएशनविरुद्ध केलेल्या दिशाभूल व्यक्तव्यामुळे आणि अपमानास्पद कमेंट्समुळे जारी करण्यात आली आहे. संजू सॅमसनचे वडील सॅमसन विश्वनाथ आणि इतर दोन व्यक्तींविरुद्ध निराधार आरोप केल्याबद्दल नुकसानभरपाईचा दावा दाखल केला जाईल.' विजय हजारे ट्रॉफीसाठी केरळ संघातून सॅमसनला वगळल्याबद्दल केसीएवर टीका होत असताना श्रीशांतने हे विधान केले होते.

हे ही वाचा: इतका राग...भर मैदानातच कर्णधार शुभमन गिलची पंचांशी दोनदा बाचाबाची, गुजरात-हैदराबाद सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा

श्रीशांतची प्रतिक्रिया काय होती?

केरळ क्रिकेट असोसिएशनने त्याच्यावर केलेल्या तीन वर्षांच्या बंदीबद्दल माजी भारतीय क्रिकेटपटू एस श्रीशांतने भाष्य करणे टाळले आहे. त्याने स्पष्टपणे सांगितले की त्याला याबद्दल माहिती नाही. आयएएनएसच्या वृत्तानुसार, श्रीशांतने उत्तर दिले, 'मला याची माहिती नाही.' दरम्यान, श्रीशांत आता केसीएकडून अधिकृत संदेशाची वाट पाहत आहे आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तो तीन वर्षांच्या निलंबनाविरुद्ध कायदेशीर मदत घेणारा आहे. 

हे ही वाचा: 3 चित्रपटांनी केली 3200 कोटींची कमाई, बनली 29 व्या वर्षी सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री; तुम्ही ओळखू शकता कोण आहे ही सुंदरी?

 

श्रीशांत अनेकदा वादात सापडला आहे. २०१३ मध्ये, श्रीशांत फिक्सिंगच्या आरोपांत अडकला होता. तेव्हाही त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती.

Read More