Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'हे बघ तुला जर...', सचिन तेंडुलकरने पृथ्वी शॉला दाखवला आरसा, स्पष्ट शब्दांत सांगितलं 'मला आता तुझ्यावर...'

सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) अद्यापही आपल्यावर तितकाच विश्वास असून, मी पुन्हा पुनरागन करु शकतो असं म्हटल्याचं पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) सांगितलं आहे.   

'हे बघ तुला जर...', सचिन तेंडुलकरने पृथ्वी शॉला दाखवला आरसा, स्पष्ट शब्दांत सांगितलं 'मला आता तुझ्यावर...'

एकेकाळी भारतीय क्रिकेटचं भविष्य म्हणून पाहिला जाणारा पृथ्वी शॉ, आता मात्र क्रिकेट चाहत्यांच्या विस्मरणात गेला आहे. भारतीय संघानंतर त्याला आता मुंबईच्या रणजी संघातूनही डच्चू देण्यात आला आहे. 2025 च्या आयपीएल लिलावातही त्याला कोणी संघात विकत घेतलं नाही. मात्र यानंतरही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला तो पुनरागन करेल असा विश्वास आहे. पृथ्वी शॉने आपल्या वडिलांनंतर सचिन तेंडुकरने आपल्याला सर्वात जास्त पाठिंबा दिल्याचं म्हटंल आहे. तसंच आपली अर्जुन तेंडुलकरशी खास मैत्री असल्याचंही सांगितलं आहे. 

"माझे वडील माझी सर्वात मोठी सपोर्ट सिस्टीम आहे. पण त्यानंतर सचिन तेंडुलकर यांना माझ्याबद्दल सर्वाधिक माहिती आहे. अर्जुन आणि मी वयाच्या आठव्या, नवव्या वर्षांपासून मित्र आहोत. सरही तिथे असायचे. त्यांनी मला पाहिलं आहे," असं पृथ्वी शॉने न्यूज 24 ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. 

"दोन महिन्यांपूर्वी, सचिन सर एमआयजीमध्ये मास्टर लीगसाठी सराव करत होते. मीदेखील तिथे होतो. अशावेळी तुम्हाला तुमच्यात ऊर्जा निर्माण करेल अशा मेंटॉरची गरज असते," असं पृथ्वी शॉ म्हणाला. शॉने खुलासा केला की तेंडुलकर त्याला आजही सल्ला देत राहतो आणि तो संघर्षातून परत येऊ शकतो असा विश्वास त्याला देत असतो.

"त्यांचा अजूनही माझ्यावर विश्वास आहे. 'पृथ्वी माझा विश्वास आहे आणि तो यापुढेही राहील'. त्यांनी मला पाहिलं आहे. त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. 'अद्यापही सर्व काही शक्य आहे'. तो विश्वास माझ्यासाठी फार मोलाचा आहे. वडिलांप्रमाणे काही मोजक्या मित्रांचा माझ्यावर विश्वास आहे," असं पृथ्वीशॉने सांगितलं. 

दरम्यान, शॉला सोमवारी एमसीएने नवीन देशांतर्गत संघात सामील होण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याने मुंबईशी संघासोबतचं नातं संपवलं आहे. शॉ काही काळापासून लाल एकदिवसीय क्रिकेटमधून दूर आहे, मात्र कसोटी क्रिकेट खेळताना दिसतो. तथापि, त्याच्या मैदानाबाहेरील शिस्तभंगाच्या समस्या मैदानावरील कामगिरीपेक्षा जास्त लक्ष वेधून घेत आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने पृथ्वी शॉने विनंती केल्याला पुष्टी दिली असून ती मान्य केली आहे.

"मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) हे कळवू इच्छिते की क्रिकेटपटू पृथ्वी शॉने आगामी देशांतर्गत हंगामात व्यावसायिक खेळाडू म्हणून दुसऱ्या राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी औपचारिकपणे ना हरकत प्रमाणपत्राची (एनओसी) विनंती केली होती. योग्य विचार केल्यानंतर, एमसीएने एनओसी मंजूर केली आहे," असं एमसीएचे सचिव अभय हडप यांनी सांगितलं. गेल्या काही वर्षांत शॉच्या योगदानाचे संस्था कौतुक करते.

"पृथ्वी शॉ हा एक असाधारण प्रतिभा आहे आणि त्याने मुंबई क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आम्ही त्याच्या निर्णयाचा आदर करतो आणि त्याच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी त्याला शुभेच्छा देतो," असंही ते म्हणाले आहेत. एमसीएला पाठवलेल्या पत्रात, 25 वर्षीय शॉने म्हटलं आहे की तो 2017 मध्ये पदार्पण केल्यापासून मुंबई संघात घालवलेल्या वेळेबद्दल कृतज्ञ आहे, परंतु आता पुढे जाण्याची त्याची इच्छा आहे.

Read More