Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

VIRAL PHOTO : सचिनकन्या सारा तेंडुलकर पुन्हा एकदा चर्चेत

साराच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीसाठी अंजली आणि सचिनही लंडनमध्ये दाखल झाले

VIRAL PHOTO : सचिनकन्या सारा तेंडुलकर पुन्हा एकदा चर्चेत

मुंबई : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर पुन्हा एकदा चर्चेत आलीय... आणि यावेळचं कारण म्हणजे सारानं तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलंय. सारानं युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमधून मेडिसिनमध्ये ग्रॅज्युएशनची डिग्री मिळवलीय. सारानं स्वत:च आपल्या ऑपिशिअल इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आपल्या ग्रॅज्युएशन सेरेमनीमधले काही फोटो शेअर करत याची माहिती दिलीय. 

साराच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीसाठी अंजली आणि सचिनही लंडनमध्ये दाखल झाले. सारानं या कार्यक्रमातले काही फोटो शेअर केलेत. यामध्ये, आपल्या मुलीचं हे यश पाहून आनंदीत झालेले सचिन आणि अंजलीही दिसत आहेत. 

View this post on Instagram

I did what?

A post shared by Sara Tendulkar (@saratendulkar) on

सारानं आपलं शालेय शिक्षण मुंबईतल्या धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून पूर्ण केलंय. त्यानंतर ग्रॅज्युएशनसाठी ती लंडनला गेली होती. 

सारा अनेकदा आपल्या आई-वडिलांसोबत अनेक कार्यक्रमांत दिसते... यावेळीही ती हेडलाईनमध्ये असते. नुकतीच ती आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांच्या साखरपुड्याला दिसली होती. सारा सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असते. 

Read More