Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'जय हिंद की सेना...' वीरेंद्र सेहवाग ते वरुण चक्रवर्ती Operation Sindoor वर क्रिकेटपटूंनी दिली प्रतिक्रिया

Indian Cricketers Reaction on Operation Sindoor: भारतातील दिगज्ज ते तरुण क्रिकेटपटूंनी भारताने केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'वर सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय क्रिकेट जगतातूनही या ऑपरेशनला पाठिंबा मिळाला आहे.

'जय हिंद की सेना...' वीरेंद्र सेहवाग ते वरुण चक्रवर्ती Operation Sindoor वर क्रिकेटपटूंनी दिली प्रतिक्रिया

India vs Pakistan, Cricketers Reaction on Operation Sindoor: पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं उत्तर म्हणून भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ला केला. भारतीय सशस्त्र दलांनी बुधवारी सकाळी 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले. यामध्ये पाकव्याप्त काश्मीर (POK) मध्ये, भारतीय सैन्याने लष्करी कारवाई करत एकूण नऊ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली. हा हल्ला पहलगाम हल्ल्यानंतर अगदी १५ दिवसांनंतर ही कारवाई करण्यात आली.  आता या ऑपरेशन नंतर देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत.  ऑपरेशन सिंदूरनंतर, भारतीय क्रिकेट संघाच्या क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत आनंद आणि भारतीय सेनेचे कौतुक केले आहे. 

काय म्हणाले क्रिकेटर्स?

भारतीय क्रिकेट संघाचे माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, “धर्मो रक्षा रक्षिता जय हिंद की सेना!”. वीरेंद्रचा ही पोस्ट  देशाच्या लष्करी सामर्थ्याबद्दल अभिमान दर्शवते. पहलगाम हल्ल्यानंतर वीरेंद्रनेही त्याचा तीव्र निषेध केला होता. आता या कारवाईनंतर त्यांनी भारतीय सैन्याचे कौतुक केले आहे.

हे ही वाचा: भारताच्या हल्ल्यामुळे क्रिकेट विश्वातही भीतीच वातावरण, PSL सोडून पळणार आंतरराष्ट्रीय खेळाडू?

या हल्ल्यावर तरुण क्रिकेटपटू वरुण चक्रवर्तीनेही प्रतिक्रिया दिली आहे.  त्यानेही भारतीय सैन्याचे कौतुक केले. इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करून त्याने ऑपरेशन सिंदूरचे कौतुक केले आहे. 

 

 

एवढंच नाही तर त्याच्यासोबतच माजी खेळाडू सुरेश रैनानेही भारतीय सैन्याच्या धाडसाचे कौतुक केले आहे.

दरम्यान, लखनऊ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका यांनीही ऑपरेश सिंदूरवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले, 'दहशतवाद कधीही जिंकणार नाही. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारत दृढ आणि एकजूट आहे. आमच्या शूर सशस्त्र दलांना सुरक्षितता आणि यश मिळो अशी शुभेच्छा.' #Operation Sindoor

हे ही वाचा: India vs Pakistan: युद्धादरम्यान खेळाला गेला होता भारत विरुद्ध पाकिस्तान सामना, जाणून घ्या कधी आणि कुठे झाली होती मॅच

क्रिकेटचा देवता भारतचा माजी स्टार खेळाडू सचिन तेंडुलकरने लिहिले की, 'एकतेत निर्भय. शक्ती मध्ये अमर्यादितता. भारताची ढाल म्हणजे त्यांचे लोक. या जगात दहशतवादाला स्थान नाही. आम्ही एक संघ आहोत! जय हिंद.'

हे ही वाचा: Operation Sindoor: 'तुम्ही धुळीत मिसळाल...' अमिताभ ते रितेश... भारताच्या सर्जिकल स्ट्राईकला केला जोरदार सलाम, केले कौतुक

भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर हे रात्री 2 वाजताच्या सुमारास केले. यामध्ये कमीत कमी 30 दहशतवाद्यांचा खात्मा झाला असून पाकिस्तानात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. भारत सरकारने स्पष्ट केले आहे की या कारवाईत फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना लक्ष्य करण्यात आले होते आणि कोणत्याही पाकिस्तानी नागरिक किंवा लष्करी संरचनेला नुकसान झाले नाही. 

 

 

 

Read More