Happy Holi 2022 : होळीच्या निमित्ताने संपूर्ण देशात उत्सवाचं वातावरण आहे. प्रत्येक शहरात आणि गावात लोक रंगांचा सण साजरा करत आहेत. या खास सणानिमित्ताने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) त्याच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सचिनने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत चाहत्यांना होळी सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सचिनचा हा फोटो पसंतीस आला असून अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सचिनने त्याच्या चाहत्यांसाठी एक फोटो ट्विट केला आहे. यामध्ये त्याच्या हातात विविध रंगानी भरलेली एक प्लेट दिसत आहे. सचिनने फोटोसोबत कॅप्शनमध्ये एक मजेशीर ओळ लिहिली आहे. त्याने आपल्या चाहत्यांना होळीचे फोटो ट्विट करण्याचं आवाहनही केलं आहे. सचिनच्या या फोटोला ट्विटरवर 60 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे.
Adding some more colours to your feed
— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 18, 2022
Share your holi Tweeple#HappyHoli pic.twitter.com/ofvXI283hj
मास्टर ब्लास्टरच्या या फोटोवर चाहते अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तर काही चाहत्यांनी सचिनच्या सर्वोत्तम खेळीचे व्हिडिओ ट्विट केले आहेत. क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिनच्या नावावर अनेक विश्वविक्रम जमा आहेत. यातील अनेक विक्रम असे आहेत की ते अजूनही अबाधित आहेत.