Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

सचिनच्या फॅनचा धोनीच्या परिवारासोबत लंच

सुधीर गौतमने ट्विटरवर महेंद्रसिंग धोनी आणि त्याच्या परिवारासोबतचा फोटो शेअर केला.

सचिनच्या फॅनचा धोनीच्या परिवारासोबत लंच

नवी दिल्ली : भारताच्या क्रिकेट मॅचमध्ये सचिन तेंडुलकरला चीअर करायला येणारा फॅन सुधीर गौतम आपसुकच कॅमेऱ्याच लक्ष वेधून घेतो.सचिनने निवृत्ती घेतल्यानंतरही या फॅनच सचिनवरील प्रेम काही कमी झालं नाही. आताही सुधीर भारतीय टीमला चीअर करताना दिसतो. आपल्या शरीरावर रंग आणि हातामध्ये तिरंगा फडकवाताना सुधीर दरवेळेस दिसतो. सचिनच्या या फॅनच क्रिकेटवर निस्सिम प्रेम आहे. सचिनची बॅटींग पाहण्यासाठी त्याने सायकलवरून बांगलादेश आणि पाकिस्तानची यात्रा केली आहे. २०१५ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला झालेला वर्ल्ड कप पाहायलाही गेला होता. अशा या सचिनच्या जबरा फॅनला भारताचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीने आपल्या घरी लंचला बोलावले होते. 

फोटो शेअर 

सुधीर गौतमने ट्विटरवर महेंद्रसिंग धोनी आणि त्याच्या परिवारासोबतचा फोटो शेअर केला. 'कॅप्टन कूलसोबत एक खास दिवस. फार्म हाऊसमध्ये सुपर फॅमिलीसोबत सुपर लंच. धन्यवाद, एम.एस.धोनी आणि साक्षी ताई' अशी कॅप्शन त्याला दिली. लंचच्या टेबलावर महेंद्र सिंग धोनी सहित त्याची पत्नी,वडिल पान सिंह आणि इतर लोकही दिसत आहेत. 

Read More