Zaheer Khan and Sagarika Ghatge's Son : बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगेनं अखेर तिच्या मुलाचा चेहरा दाखवला आहे. रविवारी फादर्स डे निमित्तानं सागरिका घाटगेनं ही पोस्ट शेअर केली आहे. सागरिका घाटगेनं एक कोलॅब पोस्ट शेअर केली असून तिनं कॅप्शन मध्ये लिहिलं की मी कॅप्शन लिहिणाऱ्यांपैकी नाही. पण आज लिहिते. कारण कधीतरी आमचा मुलगा देखील हे वाचेल आणि त्याला हे जाणून आश्चर्य होईल की तो खूप नशिबवान आहे की त्याच्या आयुष्यात तू आहेस.
सागरिकानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिनं तिच्या मुलाचा चेहरा दाखवला आहे. रविवारी फादर्स डेच्या निमित्तानं सागरिकानं ही पोस्ट शेअर करत झहीर खानसोबत कोलॅब केलं आहे. सागरिका घाटगेनं झहीर खानसोबत पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये दिसलं की 'मी कॅप्शन लिहिणाऱ्यांपैकी नाही, पण आज लिहिते. कारण कधीतरी आपला मुलगा हे वाचेल आणि त्याला हे जाणून घ्यायची गरज असेल की तो खूप नशिबवान आहे की त्याच्या आयुष्यात तू आहेस.'
सागरिका घाटगेनं पुढे लिहिलं की "जसं तू प्रत्येकावर प्रेम करतोस, जसं तू कायम प्रत्येकाविषयी विचार करतो आणि त्यांच्यासाठी त्यांच्या कठीण काळात तू उभा असतोस. त्यांची हिम्मत बनतोस. जर तो मोठा होऊन तुझ्यासारखा झाला तर तो खूप खास असेल. आपल्या मुलासमोर असलेलं हे एक उत्तम उदाहरण आहे. फादर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा"
थोडक्यात सागरिकाचं म्हणणं होतं की 'ज्या प्रकारे तू तुझ्या आयुष्यात असलेल्या प्रत्येकाची काळजी घेतोस आणि कोणत्याही परिस्थितीवर कशीही प्रतिक्रिया देण्या ऐवजी शांत राहणं ही तुझ्यात असलेली ताकदच न बोलता एका वेळी हजार शब्द बोलून जाते.'
हेही वाचा : फक्त बुलेटच नाही तर 'या' गोष्टीही बनवते 'रॉयल एनफील्ड'; कट्टर बुलेट प्रेमींनाही नसेल कल्पना
दरम्यान, सागरिकानं 16 एप्रिल रोजी त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला. त्यांनी ही बातमी देत चाहत्यांपासून सगळ्यांना आश्चर्य आणि सुखद धक्का दिला होता. त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव फतेसिंह खान ठेवलं आहे. आता फादर्स डे च्या निमित्तानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पहिल्यांदा सागरिका आणि झहीरनं त्यांच्या मुलाचा चेहरा दाखवला आहे. आतापर्यंत त्यांनी सोशल मीडियावर त्याचा फोटो शेअर केला नव्हता.