Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

नंबर 3 साठी मैदानात कोण उतरणार? 'या' दोन खेळाडूंमध्ये चुरस! कर्णधार शुभमन गिल कोणाला जागा देणार?

India vs England 1st Test, Sai Sudharsan or Karun Nair: : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी कर्णधार शुभमन गिलने स्पष्ट केले आहे की तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. यामुळे आता तिसऱ्या क्रमांकावर कोणता फलंदाज फलंदाजी करणार हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.  

नंबर 3 साठी मैदानात कोण उतरणार? 'या' दोन खेळाडूंमध्ये चुरस! कर्णधार शुभमन गिल कोणाला जागा देणार?

India vs England 1st Test, number 3 batting position: भारत आणि इंग्लंड यांच्यातील बहुप्रतीक्षित पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना २० जून रोजी लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर रंगणार आहे. इंग्लंडने आपली प्लेइंग इलेव्हन आधीच जाहीर केली असली, तरी भारतीय संघाचे अंतिम संयोजन अजून गुलदस्त्यातच आहे. मात्र, सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार शुभमन गिलने स्पष्ट केलं आहे की, तो आता नंबर ४ वर फलंदाजी करणार आहे. याआधी तो नेहमी नंबर 3 वर फलंदाजी करत होता, पण आता विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर मिडल ऑर्डरची धुरा स्वतःकडे घेणार आहे. आता यामुळे प्रश्न निर्माण होतो की शुभमन गिल चौथ्या नंबरवर आल्यावर नंबर 3 वर कोण खेळणार? याबद्दल अनेक चर्चा सुरु आहेत. आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे ते नंबर 3 वर कोण खेळणार याकडे.  या क्रमांकासाठी दोन साई सुदर्शन आणि करुण नायर हे दोन प्रमुख दावेदार आहेत 

साई सुदर्शनचा जबरदस्त फॉर्म

23 वर्षीय डावखुरा फलंदाज साई सुदर्शन सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. आयपीएल 2025 मध्ये त्याने 15 सामन्यांत 759 धावा केल्या. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळेच त्याला कसोटी संघात प्रथमच स्थान मिळालं आहे. त्याने ऑरेंज कॅप जिंकून स्वतःचं स्थान मजबूत केलं आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्येही त्याचं उत्तम योगदान असून त्याने आतापर्यंत 1957 धावा केल्या आहेत.

हे ही वाचा: Tendulkar-Anderson Trophyचे झाले अनावरण! 17 वर्षांनंतर ‘पतौडी ट्रॉफी’चं नाव का बदललं? जाणून घ्या कारण

 

करुण नायर अनुभवी खेळाडू 

दुसरीकडे, अनुभवी करुण नायरने आपल्या खेळाने पुन्हा एकदा कसोटी संघात पुनरागमन केलं आहे. त्याने शेवटचा टेस्ट सामना 2017 मध्ये खेळला होता, पण त्याआधी इंग्लंडविरुद्ध तिहरा शतक ठोकलेला नायर या स्पर्धेत पुन्हा चर्चेत आला आहे. त्याच्या नावावर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 8470 धावा आणि लिस्ट-ए मध्ये 3128 धावा आहेत. आयपीएल 2025 मध्ये त्याने काही दर्जेदार खेळी करत आपली उपस्थिती पुन्हा जाणवून दिली.

हे ही वाचा: आज रंगणार IND vs ENG 1st Test ! टीव्हीवर आणि ऑनलाइन कधी, कुठे आणि कसा पाहता येईल सामना? जाणून घ्या

 

कोणाला मिळू शकतो तिसरा नंबर?

करुण नायरच्या अनुभवाकडे बघता  शुभमन गिल त्याला नंबर 3 वर उतरवण्याचा विचार करू शकतो. दुसरीकडे, साई सुदर्शनला मिडल ऑर्डरमध्ये संधी दिली जाऊ शकते. ओपनिंगसाठी यशस्वी जैस्वालसोबत केएल राहुल मैदानात उतरतील, अशीही शक्यता आहे.

Read More