Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Saina Nehwal चा संसार मोडला! लव्ह मॅरेजनंतर घटस्फोट; Insta पोस्ट चर्चेत, म्हणाली, 'आम्ही दोघेही...'

Saina Nehwal Divorce News: भारताला ऑलिम्पिकचं पदक जिंकवून देणारी पहिली बॅडमिंटनपटू अशी ओळख असलेल्या सायनाने आपल्या निर्णयाची घोषणा सोशल मीडियावरुन केली आहे.

Saina Nehwal चा संसार मोडला! लव्ह मॅरेजनंतर घटस्फोट; Insta पोस्ट चर्चेत, म्हणाली, 'आम्ही दोघेही...'

Saina Nehwal Divorce News: भारताची फुलराणी सायना नेहवाल आणि तिचा पती पारूपल्ली कश्यप वेगळे होणार आहे. दोघेही घटस्फोट घेत असल्याची माहिती स्वत: सायनाने दिली आहे. सायनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रविवारी रात्री उशीरा एक स्टोरी शेअर करत आपण विभक्त होत असल्याचं जाहीर केलं. 

मैत्री, प्रेम अन् लग्न...

भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू असलेल्या सायनाने 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकावर नाव कोरलं. तेव्हापासूनच ती प्रकाशझोतात आली. खरं तर सायना नेहवाल आणि पारूपल्ली कश्यप हे मागील फार वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. त्यांच्या या ओळखीचं रुपांतर नंतर मैत्रीत आणि मग प्रेमात झालं.  सायना आणि कश्यप या दोघांची पहिली भेट हैदराबादमधील दिग्गज भारतीय बॅडमिंटनपटू पुलेला गोपीचंद यांच्या अकादमीत झाली, जिथे दोघेही प्रशिक्षण घेत होते. इथूनच त्यांची प्रेमकथा आकार घेऊ लागली.  2018 मध्ये लग्नबंधनात अडकल्यानंतर आता सात वर्षांनी दोघेही विभक्त होत आहेत. विशेष म्हणजे दोघांचंही लव्ह मॅरेज होतं. दोघेही एक दशक एकमेकांना डेट करत होते. दोघे 14 डिसेंबर 2018 रोजी विवाहबंधनात अडकले. मात्र लग्नाला सात वर्ष पूर्ण होण्याच्या आतच ते विभक्त होत असल्याची घोषणा सायनाने केली आहे.

घटस्फोटाची घोषणा करताना सायनाने काय म्हटलंय?

सायना नेहवालने रविवारी रात्री उशीरा इन्स्टाग्रामवर अचानक घटस्फोट घेत असल्याची पोस्ट शेअर करत सर्वच चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. "कधी कधी आयुष्य आपल्याला वेगळ्या वळणावर घेऊन जातं. बराच विचार केल्यानंतर कश्यप पारूपल्ली आणि मी आता वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही दोघेही स्वतःसाठी आणि एकमेकांसाठी स्थैर्य, यशस्वी आणि शांततापूर्ण जीवन जगण्यास प्राधान्य देत आहोत. या प्रवासात पुढे जाताना मी त्याचं चांगलं व्हावं म्हणून शुभेच्छा देत सर्व छान आठवणींसाठी त्याचे आभार मानते," असं सायनाने पोस्टमध्ये म्हटलं आहे. "या कठीण काळामध्ये तुम्ही आमच्या खासगीपणाचं भान आणि सन्मान ठेवाल अशी अपेक्षा बाळगते," असंही सायनाने पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे.

fallbacks

सायानाने फोटो काढून टाकले; मात्र कश्यपच्या खात्यावर अजूनही आहेत दोघांचे फोटो, व्हिडीओ

सायना नेहवाल आणि कश्यपमध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून होती. सायनाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कश्यपबरोबरचा एकही फोटो दिसत नव्हता. मात्र दुसरीकडे कश्यपच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सायनाबरोबरचे फोटो, व्हीडिओ अजूनही दिसत आहेत.. मार्च महिन्यात सायनाच्या वाढदिवसानिमित्त केलेली पोस्टही कश्यपच्या अकाऊंटवर दिसत आहे. बॅडमिंटनसंदर्भातील सायनाबरोबरचे व्हीडिओदेखील कश्यपच्या अकाऊंटवर दिसत आहेत. 

Read More