Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

भारताची फुलराणी सायना लवकरच अडकतेय विवाहबंधनात

 २१ डिसेंबर रोजी भव्य रिसेप्शनचं आयोजन

भारताची फुलराणी सायना लवकरच अडकतेय विवाहबंधनात

नवी दिल्ली : भारताची बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवालनं विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतलाय. सायना नेहवाल आणि बॅडमिंटन खेळाडू पी. कश्यप यांचा विवाह या वर्षाच्या अखेरीस होणार आहे. १६ डिसेंबर रोजी सायना आणि कश्यप विवाहबंधनात अडकतील. अतिशय खासगी पद्धतीनं विवाह करण्याचा निर्णय या दोन बॅडमिंटन खेळाडूंनी घेतलाय. केवळ शंभर जणांनाच विवाहाला आमंत्रित करण्यात येणार आहे. 

दरम्यान २१ डिसेंबर रोजी भव्य रिसेप्शन आयोजित करण्यात येणार आहे. सायना आणि कश्यप दोघेही हैदराबादमधले असून ते जवळपास दहा वर्षांपासून डेट करत असल्याचा खुलासा झालाय.

fallbacks
सायन आणि पी कश्यप

सायना २८ वर्षांची असून तिनं ऑलिम्पिक आणि राष्टकुल स्पर्धेत भारताला पदकांची कमाई करुन दिलीय. तर पी. कश्यम ३२ वर्षांचा असून त्यानं राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला पदक पटकावून दिलय. 

सानिया-शोएब, दिपिका पल्लिकल-दिनेश कार्तिक, इशांत शर्मा-प्रतिमा सिंग, गीता फोगट-पवन कुमार, साक्षी मलिक-सत्यवर्त कादियानंतर सायना आणि कश्यप विवाहबंधनात अडकणारे खेळाडू ठरणार आहेत. 

Read More