Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Saina Nehwal च्या घटस्फोटाला नवं वळण; घोषणेनंतर 3 आठवड्यात म्हणते, 'आता आम्ही...'

Saina Nehwal Parupalli Kashyap Divorce New Twist: सायनाने 13 जुलै रोजी इन्स्टाग्राम स्टेटसवरुन विभक्त होत असल्याची घोषणा केलेली. आता तिने एक नवी पोस्ट केली आहे.

Saina Nehwal च्या घटस्फोटाला नवं वळण; घोषणेनंतर 3 आठवड्यात म्हणते, 'आता आम्ही...'

Saina Nehwal Parupalli Kashyap Divorce New Twist: भारतीय बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांनी विभक्त होण्याची घोषणा केल्यानंतर काही आठवड्यांनंतरच त्यांनी यू-टर्न घेतल्याचे दिसून येते. 14 जुलै रोजी सार्वजनिकरित्या आपण विभक्त होत असल्याची घोषणा करणाऱ्या या सेलिब्रिटी जोडप्याने आता इंस्टाग्रामवर पुन्हा एकदा एकत्र एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला देण्यात आलेल्या कॅप्शनमुळे चाहत्यांना आता दोघे पुन्हा एकत्र येतील अशी आशा वाटत आहे.

नव्यानं दोघांनी काय घोषणा केली?

दोघांच्याही प्रोफाइलवर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये दोघे एकत्र हसत फोटोसाठी पोज देत असल्याचे दिसत आहे, दोघेही आनंदी, समाधानी आणि शांतपणे एकमेकांसोबत उभे आहेत. कॅप्शनमध्ये, "कधीकधी एकमेकांमधील अंतर तुम्हाला त्या व्यक्तींच्या असण्याची किंमतीची जाणीव करुन देते. आता आम्ही पुन्हा एकदा प्रयत्न करत आहोत." असं लिहिलेलं आहे. या कॅप्शनने लगेच चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. कॅप्शनमधून दोघांनाही विभक्त होण्याचा निर्णय मागे घेतला असल्याची चर्चा चाहत्यांमध्ये आहे. सध्या दोघांचा हा फोटो व्हायरल होतोय. 

दोघांचं नातं कसं?

सायना नेहवाल आणि कश्यप हे दोघेही ऑलिम्पिक चॅम्पियन आहेत. दोघेही जागतिक दर्जाचे बॅडमिंटनपटू आहेत. दोघेही एकमेकांना वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर मागील अनेक वर्षांपासून ओळखतात. दोघे मागील अनेक वर्षांपासून एकत्र ट्रेनिंग घेत आहेत. 14 डिसेंबर 2018 रोजी लग्नबंधनात अडकल्यानंतर दोघांनी सात वर्षांनी विभक्त होण्याची घोषणा केलेली. विशेष म्हणजे दोघांचंही लव्ह मॅरेज आहे. दोघेही एक दशक एकमेकांना डेट करत होते. भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वाधिक चर्चेतील जोडप्यापैकी हे एक आहे. या दोघांची मैदानावरील आणि मैदानाबाहेरील केमिस्ट्री अनेकदा चर्चेचा विषय ठरते. म्हणूनच जुलैमध्ये या दोघांच्या घटस्फोटाच्या बातमीने अनेक चाहत्यांना धक्का बसलेला. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by SAINA NEHWAL (@nehwalsaina)

दोघांचं पॅचअप?

दोघांनीही यापूर्वी विभक्त होत असल्याची कबुली खाजगीत दिली होती. दोघांनीही करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयाच्या तीन आठवड्यांच्या आतच दोघांनी केलेल्या सोशल मीडिया पोस्टवरून असे दिसून येते की त्यांचं पॅचअप झालं आहे. दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय मागे घेतल्याची चर्चा चाहत्यांमध्ये आहे. दोघांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर एकमेकांच्या उपस्थितीची कमतरता जाणवल्याने आता परत एकत्र येण्याचा विचार केल्याचं पाहायला मिळत आहे. दोघांच्या या पोस्टने चाहतेही सुखावले आहेत.

घटस्फोटाची घोषणा करताना सायनाने काय म्हटलेलं?

सायना नेहवालने 13 जुलै रोजी रात्री उशीरा इन्स्टाग्रामवर अचानक घटस्फोट घेत असल्याची पोस्ट शेअर केली होती. "कधी कधी आयुष्य आपल्याला वेगळ्या वळणावर घेऊन जातं. बराच विचार केल्यानंतर कश्यप पारूपल्ली आणि मी आता वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही दोघेही स्वतःसाठी आणि एकमेकांसाठी स्थैर्य, यशस्वी आणि शांततापूर्ण जीवन जगण्यास प्राधान्य देत आहोत. या प्रवासात पुढे जाताना मी त्याचं चांगलं व्हावं म्हणून शुभेच्छा देत सर्व छान आठवणींसाठी त्याचे आभार मानते," असं सायनाने पोस्टमध्ये म्हटलं होतं. "या कठीण काळामध्ये तुम्ही आमच्या खासगीपणाचं भान आणि सन्मान ठेवाल अशी अपेक्षा बाळगते," असंही सायनाने पोस्टच्या शेवटी म्हटलेलं.

fallbacks

सायानाने फोटो काढून टाकले

सायनाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कश्यपबरोबरचा एकही फोटो दिसत नव्हता. आता मात्र दोघांचं पॅचअप झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Read More