Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

सनथ जयसुर्याला घ्यावा लागतोय कुबड्यांचा आधार

श्रीलंकेचा तुफानी फलंदाज आज स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी झगडतोय.

सनथ जयसुर्याला घ्यावा लागतोय कुबड्यांचा आधार

 

नवी दिल्ली : श्रीलंका टीमचा माजी कप्तान सनथ जयसूर्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोत तो कुबड्यांच्या सहाऱ्यावर दिसतोय.

श्रीलंकेचा तुफानी फलंदाज आज स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी झगडतोय.

श्रीलंकेतील वार्तापत्र 'सीलोन टुडे' ने दिलेल्या वृत्तानुसार, बिना कुबड्यांच्या सहारे तो एका पाऊलही पुढे टाकू शकत नाहीए. 

सनथचा स्कोअर 

जयसूर्याच्या तुफानी बॅटींगसमोर बॉलिंग करायला जगभरातील मोठमोठे बॉलर्सही विचार करायचे.

त्याने ४० च्या सरासरीने ११० टेस्ट मॅचमध्ये ६९७३ रन्स बनविले. तर ५० ओव्हर फॉर्मेटमध्ये ४३३ मॅचमध्ये १३,००० रन्स केले. 

Read More