RR vs CSK, IPL 2025: आयपीएल 2025 च्या या सिजनमधील राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज हा सामान 30 मार्चच्या संध्याकाळी झाला. या सामन्यात राजस्थानचा वेगवान गोलंदाज संदीप शर्माने फक्त एक विकेट घेतली पण तीच फार चराचेत आली. याचे कारण असे की ही विकेट महेंद्रसिंग धोनीची होती. ज्यावेळी धोनीची विकेट गेली त्यावेळी सामना एका नाजूक वळणावर होता. त्या क्षणी धोनीची विकेट राजस्थानसाठी विजयाचा मोठा मार्ग होता. कर्णधार रियान परागने सामन्याच्या शेवटच्या षटकात संदीप शर्माकडे ज्या आत्मविश्वासाने चेंडू सोपवला, त्या आत्मविश्वासावर तो पूर्णपणे खरा उतरला. धोनीची विकेटही गेली आणि सरतेशेवटी राजस्थानचा संघ विजयी ठरला. यानंतर संदीप शर्माने एका खास व्यक्तीला व्हिडीओ कॉल केला. पण हा कोळ कोणाला आणि का केला? चला याबद्दल जाणून घेऊयात.
चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यानंतर संदीप शर्माने आपल्या मुलाला व्हिडीओ कॉल केला. त्यांच्या मुलासोबतच्या या संभाषणाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ स्वतः राजस्थान रॉयल्सने शेअर केला आहे. वेगवान गोलंदाज संदीप शर्मा आपल्या मुलाशी व्हिडीओ कॉलवर काय बोलत आहे हे तुम्ही स्पष्टपणे ऐकू शकता. हा सामना पाहण्यासाठी त्यांचा मुलगा जागे राहिल्याचे त्यांच्या बोलण्यातून समजत आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की राजस्थान रॉयल्सच्या सपोर्ट स्टाफचा एक सदस्य संदीपच्या मुलाला विचारतो की त्याने पप्पाला टीव्हीवर पाहिले का? तर तो हो म्हणतो. पुढे संदीप शर्मा आपल्या मुलाला सांगतो की काका आता झोपायला सांगत आहेत, खूप उशीर झाला आहे. असं म्हणत संदीप हात हलवत बाय म्हणतो. व्हिडीओमध्ये संदीपच्या मागे शिमरॉन हेटमायर देखील दिसत आहे. संदीपच्या मुलाला तोही बाय बोलताना दिसत आहे. चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध 4 षटके टाकली, ज्यात त्याने 42 धावा देत मौल्यवान विकेट घेतली.